जळगावा जिल्हाबुलढाणामहाराष्ट्रमुक्ताईनगर

रामनवमीनिमित्त मुक्ताईनगर येथे कीर्तन व धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन

मुक्ताईनगर :
मुक्ताईनगर शहरात रामनवमी निमित्त दरवर्षीप्रमाणे यंदाही भक्तिमय वातावरणात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. नगरपंचायत जवळील श्री राम मंदिर येथे संताजी जगनाडे महाराज महिला भजनी मंडळ तसेच हरिभक्त पारायण (सौ. ब्रह्मक्षत्रिय) यांच्या वतीने कीर्तनाचे आयोजन करण्यात आले आहे.

सदर कार्यक्रम सकाळी १० ते १२ या वेळेत पार पडणार असून, यामध्ये रामभक्तीपर कीर्तन, भजन व पारायणाचा कार्यक्रम होणार आहे. रामनवमी उत्सवाच्या निमित्ताने मंदिर परिसरात भक्तांचा उत्साह पाहायला मिळणार आहे.

या धार्मिक कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित राहून श्रीरामाच्या नामस्मरणात सहभागी व्हावे, असे आवाहन श्रीराम मंदिर मंडळातर्फे सर्व समाज बांधवांना करण्यात आले आहे.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button