जळगावा जिल्हा

अवकाळी पाऊस वादळी वाऱ्यामुळे नुकसान झालेल्या बोदवड तालुक्यातील गावांमध्ये रक्षाताई खडसे यांनी प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली…

दि.२६ मे, रविवार रोजी रावेर लोकसभा अंतर्गत अवकाळी पाऊस व वादळी वाऱ्यामुळे झालेल्या नुकसानीची बोदवड तालुक्यातील विविध गांवात स्थानिक भाजपा पदाधिकारी यांच्यासह खासदार श्रीमती रक्षाताई खडसे यांनी प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली, तसेच संबंधितांकडून तत्काळ पंचनामे करून घेण्याच्या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना सूचना केल्या.

अवकाळी पाऊस व जोरदार वादळामुळे बोदवड तालुक्यात पिकांसह महावितरण साहित्य म्हणजे पोल, तार व रोहीत्राचे खूप मोठे नुकसान होऊन झालेले असून, त्यांच्या उभारणीसाठी उपमुख्यमंत्री तथा ऊर्जामंत्री श्री.देवेंद्रजी फडणवीस यांच्याकडे पाठपुरावा केलेला असल्याचे सांगून, नुकसानग्रस्त शेतकरी व नागरिकांना लवकरात लवकर मदत मिळवून देण्यासाठी आपल्या परीने पुरुपूर प्रयत्न करणार असल्याबाबत यावेळी खासदार श्रीमती रक्षाताई खडसे यांनी आश्वासन देऊन धिर दिला.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button