आंतरराष्ट्रीयबुलढाणामलकापूरमहाराष्ट्र

राज्यस्तरीय धर्नुविद्या निवड चाचणी संपन्न

बुलढाणा प्रतिनिधी उषा इंगळे

बुलढाणा : तालुका क्रीडा

संकुल बुलढाणा येथे ४ मे रोजी राज्यस्तरीय धनुर्विद्या निवड चाचणी संपन्न झाली. सदर निवड चाचणी उ‌द्घाटनांसाठी बुलढाणा विधानसभा मतदारसंघाचे आमदार संजय गायकवाड यांची उपस्थिती होती.

रविवार ४ मे रोजी झालेल्या निवड चाचणीतून निवड झालेले खेळाडू, हे भारतीय संघाच्या सब ज्युनिअर व ज्युनिअर संघासाठी होणाऱ्या निवड चाचणीसाठी पात्र ठरतील, ही

निवड चाचणी ही २२ ते २५ में च्या दरम्यान पुणे येथे होणार आहे. यावेळी बुलढाणा विधानसभा मतदार संघाचे आमदार संजय गायकवाड यांनी उपस्थितीत खेळाडूंना यावेळी पुढील निवड चाचणीसाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी प्रशिक्षक चंद्रकांत इलग, नितीन आपार, भरत ओलेकर, अॅड. कारंजकर, नितीन आधाव अंकुश बोराडे, सतीश मुंडे, देवानंद ताठे, अरुण वाघ, डॉ. नरवाडे व संपूर्ण राज्यातून आलेले खेळाडू व पालक उपस्थित होते. (का.प्र.)

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button