ग्रामपंचायत रायखेड वर प्रहारचा झेंडा, अशोकराव नेमाडे यांची सरपंच पदी अविरोध निवड

ग्रामपंचायत रायखेड वर प्रहारचा झेंडा, अशोकराव नेमाडे यांची सरपंच पदी अविरोध निवड
स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस
तेल्हारा
तालुका प्रतिनिधी.
तेल्हारा तालुक्यातील रायखेड ग्रामपंचायत मध्ये दि.१५ सप्टेंबर २०२३ गुरुवार रोजी ग्रामपंचायत कार्यालय येथे अशोकराव गोविंदराव नेमाडे यांची सरपंच पदी सर्व सदस्यांनी अविरोध निवड केली व उपसरपंचपदी राजेंद्र मोंडोकार यांची निवड केली येथील ग्रामपंचायतची सात सदस्याची कार्यकारणी असून खेडीमेडीच्या वातावरणात अशोकराव गोविंदराव यांची सरपंच पदी निवड करण्यात आली अशोकराव गोविंदराव नेमाडे हे लोकनायक बच्चू कडू यांचे निष्ठावंत शेतकरी आघाडीचे उपजिल्हाप्रमुख असून सदन शेतकरी आहेत त्यांचा तालुक्यामध्ये दांडगा परिचय आहे आज त्यांची सरपंचाची निवड झाल्यामुळे गावामध्ये नवचैतन्य निर्माण झाले निवडणूक अधिकारी म्हणून सावंत साहेब व ग्रामविकास अधिकारी म्हणून टिकार साहेब यांनी निवडणूक पार पाडली यावेळी ग्रामपंचायतचे सदस्य स्वाती निलेश नेमाडे ,रश्मी अमोल नेमाडे, संतोष महादेव तायडे, जया नागोराव साबळे व गावातील प्रतिष्ठित नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.



