दिशा महिला बचत गट फेडरेशन ची कार्यशाळा उत्साहात ! जयश्री शेळके म्हणाल्या,

दिशा महिला बचत गट फेडरेशन ची कार्यशाळा उत्साहात ! जयश्री शेळके म्हणाल्या,
स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस
जिल्हा प्रतिनिधी
उषा इंगळे बुलढाणा
दिशा बुलढाणा जिल्हा महिला बचत गट फेडरेशन सोबत जिल्ह्यातील १४०० बचत गट सलग्न आहेत. महिला बचत गटांच्या उत्पादनांची गुणवत्ता दर्जेदार असल्याने बाजारपेठेत त्यांना मागणी आहे. ग्रामीण अर्थव्यवस्था बळकट करण्याचे काम महिला बचत गटांच्या माध्यमातून केले जात असल्याचे प्रतिपादन संस्थापक अध्यक्ष जयश्री शेळके यांनी केले.
दिशा बचत गट फेडरेशनच्या वतीने ९ ऑक्टोंबर रोजी आयोजित कार्यशाळेत प्रमुख मार्गदर्शक म्हणून त्या बोलत होत्या. महानायिकांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यशाळेला प्रारंभ झाला. कार्यशाळेत सहभागी बचत गटांना रेकॉर्ड वाटप करण्यात आले. महिलांना रेकॉर्ड भरण्याचे प्रशिक्षण देण्यात आले. तळणी येथील भारत महिला बचत गटाला १ लाख ५० हजार रुपयांचे भांडवल उपलब्ध करण्यात आले. यावेळी नगराध्यक्ष माधुरीताई देशमुख, माजी सरपंच श्रद्धा ताई मामलकर, लतिका त गायकवाड यांची उपस्थिती होती. 🖊️



