महाराष्ट्र

न्याय न मिळाल्यामुळे प्रधानमंत्र्याच्या सभेदरम्यान आत्मदहनचा इशारा

वाशिम जिल्हा प्रतिनिधी
अजय गायकवाड

मालेगाव : – नाविन्यपूर्ण व वैशिष्टयपूर्ण योजना सिमेंट काँकिट रस्ता सन २०२०-२१ मालेगाव अंतर्गत प्रभाग क्र. १२, १४ व १७ मध्ये खासदार अनुप धोत्रे यांनी अधिकारी प्रियंका धायगुडै व ठेकेदारांशी संपर्क साधून कारवाई करण्याची मागणी केली होती. परंतु अध्यापही यावर कुठल्याही प्रकारची कारवाई झाली नसून न्याय न मिळाल्यामुळे ५ ऑक्टोबर रोजी तिर्थक्षेत्र पोहरादेवी येथे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची आयोजित सभेमध्ये आपण आत्मदहन करणार असल्याचा इशारा तहसीलदार यांना दिलेल्या निवेदनातून सुनील श्रीरामजी जोशी यांनी दिला आहे.
तहसीलदार मालेगाव यांना सादर केलेल्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे की सार्वजनिक बांधकाम उपविभाग श्रेणी १ अधिकारी प्रियंका धायगुडे यांनी संबंधित ठेकेदारावर कुठल्याही प्रकारची कारवाई केली नाही. तसेच वारंवार उपोषण करुनही केवळ आश्वासन देण्यापलिकडे या अधिकारी महोदयांनी काहीच केले नाही. त्यामुळे नाईलाजास्तव आपण ५ ऑक्टोबर रोजी देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या आयोजित सभेदरम्यान आत्मदहन करणार असल्याचा इशारा देत आहोत असे सुनिल श्रीराम शर्मा यांनी दिला आहे. या निवेदनावर त्यांच्या स्वाक्षरी आहेत. यावर जिल्हा प्रशासन काय कारवाई करते याकडे लक्ष लागून आहे.
चौकट
याबाबत शर्मा यांच्या शेवटच्या उपोषणाच्या दरम्यान पुण्यातील अजय दीप कंपनी कडे हे काम परत करून आंदोलन कर्त्यांचे समाधान करण्यात येईल असे आश्वासन देण्यात आले होते. पण या वादग्रस्त कंपनी विरूद्ध वाशीम येथील कामाबाबत अनेक तक्रारी असून तेथील आंदोलन कर्त्या नी ही प्रधानमंत्री दौऱ्यात जाळून घेण्याचा गंभीर इशारा देण्यात आला आहे. या कंपनीला काळ्या यादीत टाकण्याची मागणी केली आहे.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button