भाजपा नंदुरबार जिल्हा विस्तारित कार्यकारणी बैठकीस केंद्रीय राज्यमंत्री श्रीमती रक्षाताई खडसे उपस्थित…

नंदुरबार येथे केंद्रीय राज्यमंत्री श्रीमती रक्षाताई खडसे यांच्या प्रमुख मार्गदर्शनात तसेच मंत्री डॉ.विजयकुमार गावित व भाजपा प्रदेश सरचिटणीस श्री.विजयजी चौधरी यांच्या प्रमुख उपस्थितीत आज भाजपा नंदुरबार जिल्हा विस्तारित कार्यकारणी बैठक चे आयोजन करण्यात आले होते. यावेळी केंद्रीय राज्यमंत्री श्रीमती रक्षाताई खडसे यांनी उपस्थित राहून नंदुरबार जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकाऱ्यांसह उपस्थित भाजपा पदाधिकारी व कार्यकर्त्यांना आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने मार्गदर्शन केले.
यावेळी केंद्रीय राज्यमंत्री श्रीमती रक्षाताई खडसे यांच्यासह मंत्री डॉ.विजयकुमार गावित व भाजपा प्रदेश सरचिटणीस श्री.विजयजी चौधरी, जिल्हाध्यक्ष श्री.निलेश माळी, आमदार श्री.राजेश पाडवी, प्रदेश सचिव श्री.राजेंद्र गावित, माजी खासदार हिनाताई गावित, श्री.अजय भोळे, श्री.शशिकांत वाणी, श्री.दिपक पाटील, जिल्हा परिषद अध्यक्ष सुप्रियाताई गावित ई. प्रमुख उपस्थितीत होते.



