Uncategorizedअपघातक्राईमगुन्हेगारी

डंपरच्या धडकेत कारमधील पाच जण गंभीर जखमी; सुनसगावा जवळील

 

जळगाव-स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस प्रतिनिधी । जळगाव तालुक्यातील सुनसगाव येथे भरधाव डंपर आणि ओमनी कार यांच्यात झालेल्या भीषण अपघातात पाच जण गंभीर जखमी झाल्याची घटना शुक्रवार २ ऑगस्ट रोजी सकाळी ११ वाजेच्या सुमारास घडली आहे. जखमींना तातडीन शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले. या घटनेबाबत अद्याप कोणतीही नोंद करण्यात आलेली नाही.

क्राईम, जळगावडंपरच्या धडकेत कारमधील पाच जण गंभीर जखमी; सुनसगावाजवळील घटना 1 Day Ago No Comments FACEBOOKजळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव तालुक्यातील सुनसगाव येथे भरधाव डंपर आणि ओमनी कार यांच्यात झालेल्या भीषण अपघातात पाच जण गंभीर जखमी झाल्याची घटना शुक्रवार २ ऑगस्ट रोजी सकाळी ११ वाजेच्या सुमारास घडली आहे. जखमींना तातडीन शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले. या घटनेबाबत अद्याप कोणतीही नोंद करण्यात आलेली नाही.याबाबत अधिक माहिती अशी की, बोदवड येथील विविध कार्यकारी सोसायटीचे कर्मचारी खाजगी ओमनी वाहनाने शुक्रवार २ ऑगस्ट रोजी सकाळी जळगाव येथे काही कामानिमित्त येत होते. त्यावेळेला सकाळी ११ वाजेच्या सुमारास कार ही जळगाव तालुक्यातील सूनसगाव जवळून जात असतांना भरधाव डंपरने त्यांना जबर धडक दिली. या भीषण अपघातामध्ये ओमनी कारमधील विविध कार्यकारी सोसायटीचे गट सचिव सुभाष प्रभाकर बावस्कर (वय ५२), कारकून रामदास देवराम मोरे (वय ५०), सोसायटीचे सेल्समन प्रकाश निना सोनार (वय ४०) यांचेसह चालक कैलास पुंडलिक सुशीर (वय ५०) हे गंभीर जखमी झाले आहेत तर नीना कैलास सुशीर (वय ३१) या तरुणाला किरकोळ मार लागला आहे. हा अपघात घडल्यानंतर परिसरातील नागरीकांनी तात्काळ धाव घेवून जखमींना खासगी वाहनातून शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर राष्ट्रवादी कॉग्रेस शरद पवार गटाचे जिल्हाध्यक्ष अँड.रवींद्र पाटील यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांसह रुग्णालयात धाव घेऊन जखमींची विचारपूस केली. दरम्यान, पोलिसांना माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली होती. या घटनेबाबत पोलीस ठाण्यात कोणतीही नोंद करण्यात आलेली नाही.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button