
क्या बात है, भारीच की! आय एस ओ मानांकनानेउंचावली राजश्री शाहू मल्टी
स्टेटची मानस्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस
जिल्हा प्रतिनिधीउषा इंगळे बुलढाणा
ग्राहकांना दिल्या जाणाऱ्या दर्जेदार बँकिंग सेवेबद्दल राजश्री शाहू मल्टी स्टेट को-ऑप. क्रेडिट सोसायटीला ९००१:२०१५ आय एस ओ मानांकन प्राप्त झाले आहे. एव्हीपी बिझनेस सोल्युशन इंडिया प्रा. लि. कंपनीचे संचालक पुरुषोत्तम गिरी यांच्या हस्ते संस्था अध्यक्ष मालती ताई शेळके, राजश्री शाहू परिवाराचे संस्थापक भाऊसाहेब शेळके यांनी २३ सप्टेंबर रोजी हा सन्मान स्वीकारला. आय एस ओ मानांकन मिळालेल्या संस्थेची मान उंचावली आहे.संस्थापक अध्यक्ष संदीप शेळके यांनी ८ मे२०१३ रोजी राजश्री शाहू मल्टीस्टेट को-ॲप. क्रेडिट सोसायटीची स्थापना केली. संस्थेच्या राज्य आणि राज्याबाहेर ६९ शाखा आहेत. ग्राहक, सभासद, ठेवीदारांना दर्जेदार सेवा उपलब्ध करण्याला संस्थेचे प्राधान्य असते. नाविन्यपूर्ण आणि ग्राहकांच्या हिताच्या योजना राबविण्यात येतात. शेतकरी, कष्टकरी, व्यवसायिकांना पाठबळ देण्याचे काम संस्थेने केले आहे .दैनंदिन व्यवहार अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या साह्याने केले जातात. अधिकारी ,कर्मचारी यांना बँकिंग प्रशिक्षणाकरिता पाठविण्यात येते. त्यामुळे प्रशिक्षित कर्मचारी ही संस्थेची जमेची बाजू आहे. वृक्ष लागवड, रक्तदान शिबिर, कौशल्य विकास मार्गदर्शन शिबिर, स्वर्ग रथ वनराई बंधारे आदी सामाजिक उपक्रमाद्वारे संस्थेकडून सामाजिक उत्तरदायित्व निभावले जात आहे.



