*वंचित बहुजन आघाडी शेगांव तालुका व शहराच्या वतीने बैठक संपन्न*

( स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस प्रतिनिधी शेगाव मिलिंद चराटे)
वंचित बहुजन आघाडी तालुका शेगाव व शहराच्या संयुक्त विद्यमाने दि. ०४/०४/२०२३ रोजी *भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर* यांच्या जयंतीच्या निमित्ताने बैठकीचे आयोजन करण्यात आले असता ह्या बैठकीमध्ये *श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर* यांनी दिलेल्या आदेशा नुसार *भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती* पक्षाच्या वतीने साजरी करावी असा आदेश जिल्हा, तालुका व शहर यांना दिला असता या आदेशाचे पालन व्हावे व त्याचीअंमलबजावणी करण्याचा व वंचित बहुजन आघाडीच्या वतीने *डॉ.बाबासाहेब आंबेडकरांची जयंती साजरी* करण्याचा निर्णय घेण्यात आला असता जिल्हा,तालुका व शहराची कार्यकारणी हजर होती. *डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती* कोणालाही मदत न मागता कार्यकारीणी व पदाधिकाऱ्यांनी यांच्या वर्गणीतून साजरी व्हावी अशी मागणी कार्यकर्त्याकडून करण्यात आली.
*बैठकीत मंजूर करण्यात आलेले विषय*
(१) जयंती साजरी करण्यासाठी पत्रक काढणे.
(२) संपूर्ण शहरात व ग्रामीण भागात फलक लावणे.
(३) मोटारसायकल रॅली काढणे.
(४) *महात्मा फुले व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती संयुक्त साजरी करणे.*
( *५) भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त* दि.१४/०४/२०२३ला१२.०० वाजता सईबाई मोठे सामान्य रुग्णालय शेगांव येथे रुग्णांना फळ वाटप करणे.
(६)दि.१३/०४ व १४/०४ ला संपूर्ण शहर व तालुक्यात दारूबंदी करणे.
*बैठकीसाठी खालील मान्यवर हजर होते* .
ता.अध्यक्ष दादाराव अंभोरे, चंद्रभान कळंबे(जि.उपाध्यक्ष), शंकरराव पहुरकर(जि.उपाध्यक्ष),
सोपान लाजुंळकर(जि.उपाध्यक्ष) प्रकाश गवई(जि.सदस्य) मधुकर बाभुळकर(जि.सदस्य),मोहन पाटील(ता उपाध्यक्ष), शिवाजी गुरव(ता.महासचिव), कैलास दाभाडे(ता.सल्लागार), सुधाकर इंगळे(ता.उपाध्यक्ष), श्रीकृष्ण गवई(ता.सल्लागार), आशिष खंडेराव(शहर महासचिव), आशिष शेगोकार(शहर उपाध्यक्ष), संदेश शेगोकार(शहर युवा.अध्यक्ष), कपिल सिरसाट(ता.सचीव), समाधान खंडेराव(ता.सदस्य) दिपक इंगळे, संतोष तायडे,दिपक विरघट,भारत वि.शेगोकार इत्यादी कार्यकर्ते हजर होते.



