बुलढाणामहाराष्ट्रविदर्भ

केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव साहेब यांनी घेतली जस्तगावचे डोसे परिवार यांची सांत्वन पर सदिच्छा भेट…..!!!!

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस,

संग्रामपुर तालुका प्रतिनिधी, रतन भगत.

संग्रामपूर:-(जस्तगाव) दि.२०/३/२०२६-केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव साहेब यांनी संग्रामपूर दौऱ्यामध्ये जस्तगाव येथील डोसे परिवाराला सांत्वन पर भेट घेतली. सासर येथील नाव असलेल्या प्रकाश गावंडे, जिल्हा परिषद शाळा पिंपळगाव काळे येथे रुजू शिक्षिका म्हणून रुजू होत्या. सदर शिक्षिकेच्या झालेल्या घातपात प्रकरणांमध्ये जो मुलीचा कटकारस्थान रचून निर्देशक ऊन करण्यात आला त्याची पूर्ण माहिती घेण्याकरिता केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव साहेबांनी दुःखी परिवाराची भेट घेतली. तसेच संबंधित खून प्रकरणाचे निवेदनही स्वीकारले. यामधील महत्त्वपूर्ण मागण्या त्या म्हणजे गुन्हेगारांना तात्काळ फाशीची शिक्षा झाली पाहिजे. याकरिता सरकारी वकील उज्वल निकम साहेब यांनाही केस देण्यात यावी अशी विनंती सुद्धा डोसे परिवाराकडून केली आहे. तसेच घटनेचा पूर्ण तपास हा सीबीआयच्या माध्यमातून करण्यात यावा असे सुद्धा या निवेदनात नमूद केले आहे. कारण हे संबंधित निर्दयी कुणाचे प्रकरण जागतिक महिला दिन जगासमोर आलेले आहे. तसेच संबंधित खुनाचे प्रकरण हे दहा लाख रुपयांच्या वर आहे आणि त्या शिक्षिकेच्या कुणाच्या आरोपींची संख्या ही जास्तीची असू शकते या घटनेच्या तपासामध्ये मुलीचा मोठा भाऊ सुमित नागोराव डोसे यांनी या घटने वर शंका घेऊन संबंधित खून प्रकरणाचा उलगडा करण्याची महत्त्वपूर्ण भूमिका घेतली. व कमी कालावधीमध्ये चार आरोपी करण्यात पोलीस यंत्रणेला यश आले. तरी अजून सुद्धा संबंधित खून प्रकरणात आरोपींच्या संख्येत वाढ होण्याची दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे. संबंधित घटनेचे गांभीर्य पाहता यामध्ये सफल माहिती घेणे महत्त्वाचे ठरते. जेणेकरून अशा घटना परत घडणार नाहीत. कारण सुपारी किलर शेगाव मध्ये जवळपास दहा वर्षापासून राहत होता त्यामुळे बरेच प्रश्न या संबंधित खुनाच्या बाबतीमध्ये निर्माण होतात. तसेच माननीय उपमुख्यमंत्री शिंदे साहेब यांनी सुद्धा या प्रकरणामध्ये सखोल चौकशी करण्याचे आदेश संबंधित पोलीस यंत्रणा देण्यात आलेले आहेत. तरी या प्रतापराव जाधव साहेबांच्या भेटीमध्ये उपस्थित नागरिकांमध्ये मुलीचे वडील श्री नागोराव डोसे, मुलीचा मोठा भाऊ सुमित नागोराव डोसे, प्रदेश सरपंच संघटना तालुका अध्यक्ष मुलीची वहिनी सरपंच तथा कार्याध्यक्ष सरपंच संघटना संग्रामपूर, सौ विद्या सुमित डोसे, मुलीचे मोठे वडील समाधान पाटील, मुलीचे काका संतोष पाटील, तसेच गावातील व घरातील आप्त डोसे परिवार, गावातील इतर जाती धर्मातील समस्त शोकाकुल नागरिक, शिवसेना नेते चेतन भाऊ पाटील, रामभाऊ पाटील शेगाव तालुका अध्यक्ष शिवसेना, तसेच केशव पाटील तालुका अध्यक्ष शिवसेना संग्रामपूर, इत्यादी नदी मंडळी केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव साहेब यांच्या सोबत डोसे परिवाराच्या भेटीच्या वेळी उपस्थित होते. अशी माहिती डोसे परिवाराकडून मिळाली….

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button