Uncategorized

दोन दिवसाच्या चिमुकलीचे पितृछत्र हरवले झालेली मुलगी पाहून गावी परत असताना तरुणांचा अपघात मृत्यू एक गंभीर जखमी!

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस
तालुका प्रतिनिधी
प्रकाश दांडगे (जळगाव जामोद)

जळगाव जामोद: आसलगाव ते पळशी सुपो रोडवरील चुलत जवळ अज्ञात वाहनाने धडक दिल्याने दुचाकी स्वर विशाल भाऊराव मांडोकार(वय २२) जागीच ठार झाल्याची घटना सात मे रोजी रात्री 10 वाजेनंतर घडली. दोनच दिवसांपूर्वी विशालला खामगाव रुग्णालयात झालेली मुलगी पाहून तो गावी परत असताना हा अपघात घडला. मृतक विशालची मागील वर्षीच लग्न झाले होते. प्रसुतीसाठी पत्नीला खामगाव रुग्णालयात दाखल केले होते. त्यानंतर दोन दिवस अगोदर विशालला मुलगी झाली होती. त्याच्या मुलीला बघून विशाल खामगाव वरून चुलत भाऊ राजेश कचरू मंडोकार( वय २५) हे दोघे खामगाव वरून महोदय पुरकडे दुचाकी क्रमांक एम एच २८ बीव्ही ९४८५ जात होता.
त्यावेळी अज्ञात वाहनाने जबर धडक दिल्यामुळे विशाल जागीच ठार झाला, तर राजेश गंभीर जखमी झाला. त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहे. विशालच्या पश्चात पत्नी, नुकतीच जन्म झालेली मुलगी व आई-वडील असा परिवार आहे.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button