आर्यभट्ट मॅथ(चरींही) ओलंपियाड २०२३ परीक्षेत गोदावरी सीबीएसई स्कुलच्या विदयार्थ्यांचे यश जळगाव

जळगाव प्रतिनिधी रणधीर पवार
आर्यभट्ट मॅथ(चरींही) ओलंपियाड २०२३ परीक्षेत गोदावरी सीबीएसई स्कुलच्या विदयार्थ्यांचे यश जळगाव
दि २२ — नुकत्याच जाहिर झालेल्या आर्यभटट मॅथ्स ऑलंपियाड २३ परिक्षेत गोल्डमेडल प्राप्त करत गोदावरी फॉउंडेशन संचलित गोदावरी सीबीएसईच्या विदयार्थ्यांनी घवघवीत यश प्राप्त केले आहे.गोदावरी फाउंडेशन संचलित गोदावरी इंग्लिश मीडियम स्कूल, जळगाव येथील विद्यार्थ्यांनी सी. बी.एस.ई . २०२३ आर्यभट्ट मॅथ (चरींही) ओलंपियाडमध्ये भाग घेतला होता त्यामध्ये त्यांना घवघवीत यश प्राप्त झाले असून सहभागी इयत्ता पाचवीतील लीना महाजन व हिमांशू महाजन यांना प्रमाणपत्र व सुवर्णपदक प्राप्त झाले आहे. इयत्ता सहावीतील हिमांशू चौधरी यालाही सुवर्णपदक व प्रमाणपत्र देऊन सुभाषित करण्यात आले आहे. त्यांनी प्राप्त केलेल्या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष माजी खा. डॉ.उल्हास पाटील, उपाध्यक्ष सुभाष पाटील, सचिव डॉ.वर्षा पाटील, सदस्या डॉ. केतकी पाटील,हदयरोग तज्ञ डॉ. वैभव पाटील याचेंसह स्कूलच्या प्राचार्य सौ.नीलिमा चौधरी आणि सर्व शिक्षक वृंदांनी त्यांचे अभिनंदन केले. त्यांच्या यशामूळे गोदावरीच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला आहे.



