महाराष्ट्र

महाविद्यालयात तरुणांची नवमतदार नोंदणी

महाविद्यालयात तरुणांची नवमतदार नोंदणी

(स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस प्रतिनिधी शेगाव मिलिंद चराटे) शेगाव : निवडणूक आयोग राबवत असलेल्या मतदार नोंदणी विशेष म मोहिमेंतर्गत १८ वर्षांवरील प्रत्येक ि भारतीय नागरिकाला अॅपद्वारे किंवा म नमुना ६ हा अर्ज भरून मतदार नोंदणी करता येते. मतदार यादी लोकशाहीत सहभागी होण्याचे शस्त्र असल्याने वरील पद्धतीने सर्व नवमतदारांनी मतदार नोंदणी करण्याचे आवाहन तहसीलदार समाधान सोनवणे यांनी केले.खस्थानिक ग. भि. मुरारका महाविद्यालयात राज्यशास्त्र विभागाद्वारे नवमतदार नोंदणी कार्यक्रम पार पडला. अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. ए. एल. राठोड होते. महाविद्यालयातील ५२ विद्यार्थ्यांनी नमुना ६ अर्ज भरून नोंदणी केली तर काही विद्यार्थ्यांनी अॅपद्वारे नोंदणी केली. प्रास्ताविक नोडल अधिकारी तथा राज्यशास्त्र विभाग प्रमुख डॉ. विनोद गायकवाड, संचालन प्रा. श्याम मात्रे तर आभार प्रा. अनिल बनकर यांनी मानले. डॉ. वाघ, डॉ. इंगळे, प्रा. मेश्राम, प्रा. पी. बी. गायकवाड, डॉ. शर्मा, प्रा. देवर, प्रा. पोकळे उपस्थित होते.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button