काजुकतली च्या डब्यात जिवंत आळ्या, बुलढाण्यात रिलायन्स मॉलवर एफ ,डी ,ए, ची मोठी कारवाई,

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस
प्रतिनिधी -प्रशांत चव्हाण
बुलढाणा -: (दि.12 ऑगस्ट ) मिठाई खरेदी करणाऱ्या ग्राहकांच्या जीवाशी खेळ होत असल्याचा धक्कादायक प्रकार रिलायन्स मॉल बुलढाणा येथे उघडकीस आला, रिलायन्स मॉल मधून खरेदी केलेल्या प्रसिद्ध
सीताश्री – लक्ष्मीनारायण कंपनीच्या काजुकतली च्या बॉक्समध्ये बुरशी सह जिवंत आळ्या आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे, या प्रकरणाची तक्रार अन्न व औषध प्रशासनाकडे करण्यात आल्यानंतर एफडीएच्या पथकाने बुलढाणा येथील रिलायन्स मॉल वर धडक देत संबंधित मिठाईच्या साठ्याची तपासणी सुरू केली, तक्रारदाराने रिलायन्स मॉल मधून काजुकतलीचा बॉक्स खरेदी करून घरी नेला, बॉक्स उघडल्यानंतर मिठाईवर बुरशी , व जिवंत आळ्या असल्याचे आढळून आले, उत्पादनाच्या बॉक्सवर संबंधित बॅच नंबर आणि बारकोड असल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. हा प्रकार समोर आल्यानंतर अन्न व औषध प्रशासनाकडे तक्रार करण्यात आली, या तक्रारीची गंभीर दखल घेत अन्नसुरक्षा अधिकारी जी .के वसावे यांच्या नेतृत्वाखाली एफडीएच्या पथकाने रिलायन्स मॉलमध्ये पाहणी केली असता यावेळी संबंधित उत्पादनाचा साठा तसेच उत्पादनाच्या तारखाची तपासणी करण्यात आली. सदोष आढळलेल्या मिठाईचा साठा जप्त करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती समोर आली आहे, एफ डी ए ने मिठाईचे नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवले आहेत, प्रयोगशाळेच्या अहवालानंतर एफ डी ए कडून कोणती कारवाई केली जाते. याकडे बुलढाणा वासियांचे लक्ष वेधून आहे.



