पोलीस वर्दीची शान कुख्यात पांडूला जन्मठेपेचे परिसरात स्वागत

पोलीस वर्दीची शान कुख्यात पांडूला जन्मठेपेचे परिसरात स्वागत
स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस शेगाव प्रतिनिधी श्याम पहुरकर
सोनाळा परिसरातील घटना
‘सद्रक्षणाय खलनिग्रहणाय’ म्हणजे सज्जनांची रक्षा दुर्जनांना सजा. हे महाराष्ट्र पोलिसांचे ब्रीद आहे. याला अनुसरून पोलीसांनी उत्कृष्ठ तपास करून पोलीस वर्दीची शान वाढविली आहे. हे मा. अतिरिक्त सत्र न्यायालय खामगाव यांनी दिलेल्या जन्मठेपेच्या शिक्षेमूळे अधोरेखीत झाले आहे. मा. न्यायालयाने दिलेल्या या निर्णयाचे कायदाप्रेमी आमआदमीने स्वागत केले आहे. विवाहितेच्या हत्येचा प्रयत्न करण्याच्या सोनाळा येथील कुख्यात गुंड पांडूला शुक्रवार १७ फेब्रुवारीला जन्मठेप सुनावण्यात आली आहे. या घटनेचा तपास सोनाळा येथील तत्कालीन पोलीस अधिकारी व सथा एपी कायीलय औरंगाबाद येथे कार्यरत एपीआय देविदास बाळासाहेब वाघमोडे यांनी उत्कृष्टपणे केला. या तपासामूळे कुख्यत पांडूरंग भटकर रा. सोनाळा यास आजन्म कारावास मिळाला आहे. एपीआय वाघमोडे हे सन २०१७ ते १९ यामध्ये सोनाळा पोस्टेला दुय्यम ठाणेदार म्हणून कार्यरत होते. त्यावेळी ते त्यांच्या पोलीसी खाक्यामूळे सातपुड्यात
सिंघम म्हणून ओळखल्या जात असत. सोनाळा येथे ३० ऑक्टोंबर रोजी सकाळी नळावर क्षुल्लक कारणांवरून सौ. ललीताबाई समाधान भटकर यांचेवर आरोपी पांडू याने विक्रयाने वार करून जीवे मारण्याचा प्रयत्न करून परिसरात दहशत माजविली होती. सोनाळा पोस्टे मध्ये कलम ३०७, ३२६, ५०४, ५०६ भादवि नुसार गुन्हा दाखल झाला होता व आरोपी पांडू यास अटक करून तपास वाघमोडे यांनी केला. यात ९ साक्षीदार यांना कोर्टात तपासण्यात आले. त्यावेळी पोलीसांनी अत्यंत बारकाईने तपास करुन मा. खामगाव न्यायालयात चार्जशीट दाखल केली होती. तर आरोपी कुख्यात पांडू विरुद्ध पोस्टेमध्ये अनेक गुन्हे दाखल आहेत. अशा या गुंडाला पोलीसांनी उत्कृष्ट तपास केल्याने सजा मिळाली आहे. आणि ती सजा जमठेपेची आहे. याचे सोनाळा व परिसरात चौफेर स्वागत होत आहे. तर सिंघम देविदास बाळासाहेब वाघमोडे हे बदली होवून गेल्यावरही त्यांची या निकालामुळे परिसरात सर्वत्र वाहवाह होत आहे. पोलीस वर्दीची शान वाढविणाऱ्या सिंघमला मानाचा मुजरा!



