अहमदनगरमहाराष्ट्रराजकीयसामाजिक

राहुरीत शहरात ठिकठिकाणी साहित्यसम्राट लोकशाहीर डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांची 105 वी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली

राहुरीत शहरात ठिकठिकाणी साहित्यसम्राट लोकशाहीर डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांची 105 वी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली
राहुरी शहरात शनिचौक येथे लक्ष्मीनगर परिसरातील आण्णाभाऊ साठे जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष. अतुल वाघमारे. उपाध्यक्ष. सचिन भगवान जगधने. खजिनदार. राहुल जगधने. उपखजिनदार.आकाश जगधने.यांच्या उपस्थित अभिवादन करण्यात आले. त्याचबरोबर काल दिनांक 31 जुलै रोजी रात्री 12 वाजता शनी चौक येथे.फटाक्याची अतिशबाजी करण्यात आली त्यानंतर सकाळी आण्णाभाऊ साठे यांच्या स्मारका जवळ अभिवादन करण्यात आले. त्यावेळी काँग्रेस पक्षाचे चाचा तनपुरे. जयभिम मित्र मंडळ राजवाडा यांचे सर्व पदाधिकारी. आदिवासी एकलव्य संघटनेचे नामदेव पवार. महादेव कोळी समाजाचे अध्यक्ष सुनील नाना पवार. माजी नगरसेवक सोन्याबापू जगधने. अरुण साळवे. निलेश जगधने. कांतीलाल जगधने. पत्रकार दत्ता जोगदंड. आणि जयंती उत्सव समिती चे सर्व सदस्य व जेष्ठ नागरिक.यांच्या सह तालुक्यातील नेते मंडळी सोबत राहुरी पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या सह अनेक शासकीय अधिकारी देखील उपस्थित होते. त्यानंतर राहुरी बस स्थानक परिसरात देखील साहित्यरत्न शाहीर अण्णाभाऊ साठे यांची १०५ वी जयंती अँपे रिक्षा चालक मालक संघटनाचावतीने मोठ्या उत्साहाने साजरी करण्यात आली राहुरी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या हस्ते साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्प हार अर्पण करण्यात आला त्या ठिकाणी. त्याचबरोबर संध्याकाळी ठीक चार वाजता राहुरी शहरातून सुमधुर गीता सह लोकशाहीर डॉक्टर आण्णाभाऊ साठे. यांच्या मूर्ती ची भव्यदिव्य मिरवणूक काढण्यात आली. सर्व जयंती सोहळा अगदी थाटात पार पडला. यावेळी.लहुजी क्रांती सेनेचे जिल्हाध्यक्ष नंदुभाऊ शिंदे सामाजिक कार्यकर्ते पिंटू नाना साळवे नगरसेवक सोन्याबापु जगधने मराठा महासंघाचे सुनील भाऊ निमसे प्रबुद्ध भारतचे जिल्हा प्रतिनिधी आप्पासाहेब मकासरे भीम आर्मी स्टुडंट्स फेडरेशनचे जिल्हाध्यक्ष दीपक साळवे अच्युत पुजारी आदी नी साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या कार्याचा गौरव करून मनोगत व्यक्त केले प्रास्ताविक मुकेश भाऊ जगधने यांनी केले तर आभार कल्याण जगधने यांनी मांडले
या अभिवादन कार्यक्रमासाठी अन्वर सय्यद हरिभाऊ पवार सोहिल शेख सुरेश चांदणे सुनील शेलार गणेश शिरसाठ अन्वर सय्यद कचरु ननवरे सोमनाथ जगधने अमोल भांड संतोष वाघचौरे संजय जगधने अमीन मुसानी राजेंद्र गाडे बशरत शेख नबीलाल शेख संतोष जगधने पदाधिकारी उपस्थित होते या कार्यक्रमासाठी अँपे रिक्षा चालक मालक संघटनेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button