खानदेशजळगावा जिल्हामहाराष्ट्रशैक्षणिक
रावेर तालुक्यातील शिंदखेडा येथील पहिला व पहिल्याच प्रयत्नात महाराष्ट्र मुंबई पोलीस मध्ये निवड; गावात आनंदाचे वातावरण!

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस
रावेर ता . प्रतिनिधी विनोद तायडे
परिस्थिती कितीही हलाखीची असली तरीही मनात जिद्द आणि कष्टाची तयारी असेल तर कोणतेही ध्येय अशक्य नाही, हेच शिंदखेडा येथील एका सामान्य कुटुंबातील तरुणाने सिद्ध केले आहे. शिंदखेडा गावातील ज्ञानेश्वर मुरलीधर पाटील या युवकाने आपल्या अफाट परिश्रमाच्या जोरावर पहिल्याच (Mumbai Police) पोलीस द लामध्ये निवड होऊन गावाचे नाव उज्ज्वल केले आहे.
ज्ञानेश्वर ची कौटुंबिक पार्श्वभूमी अत्यंत गरिबीची आहे. त्याचे आई आणि वडील दोघेही रोजंदारीवर मोलमजुरी करून घराचा गाडा चालवतात. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीशी संघर्ष करत त्यांनी ज्ञानेश्वर ला शिकवले. आई-वडिलांचे हे कष्ट डोळ्यांसमोर ठेवून ज्ञानेश्वरने पोलीस दलात भरती होण्याचे स्वप्न पाहिले आणि पहिल्याच प्रयत्नात ते प्रत्यक्षात आणले.
त्याच्या या दुहेरी यशामुळे आई-वडिलांच्या डोळ्यात आनंदाश्रू तरळले.
ज्ञानेश्वरने आपल्या मैदानी आणि लेखी परीक्षेच्या तयारीसाठी ( CMC ) अकॅडमी’ रावेर वैभव देशमुख सर यांचे मार्गदर्शन घेतले. अकॅडमीतील मार्गदर्शकांनी दिलेल्या अचूक टिप्स, कठोर सराव आणि ज्ञानेश्वर यांची स्वतःची सातत्यपूर्ण मेहनत यामुळे त्याला हे घवघवीत यश संपादन करता आले.
कोणतीही मोठी कौटुंबिक पार्श्वभूमी नसताना केवळ मार्गदर्शनाचा योग्य वापर आणि स्वतःची जिद्द याच्या बळावर त्याने हा टप्पा गाठला.
शिंदखेडा गावात ही यशाची बातमी धडकताच संपूर्ण गावातून पहिला ( API ) तर दुसरा पोलिस झाल्या मुळे गावात आनंदीमय वातावरणात गावात त्याचा सत्कार करण्यात आला एक मोलमजुरी करण्याचा मुलगा खाकी वर्दीचा मानकरी झाल्याने ग्रामस्थांसाठी अभिमानास्पद बाबा आहे .
माझ्या आई वडिलांनी केलेल्या कष्टाचे हे फळ आहे
व माझ्या यशाचे सर्व श्रेय माझे आई वडील व माझे सर वैभव देशमुख यांना देतो.
अश्या भावना झानेश्वर पाटील यांनी व्यक्त केल्या.



