बुलढाणामहाराष्ट्रविदर्भ

पळशी झाशी येथील अज्ञात चोरीचा तपास लावा. अन्यथा तामगाव पोलीस आंदोलन:ग्रामपंचायत चा इशारा.

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस
संग्रामपूर प्रतिनिधी
संगीता उमाळे.
दि.२९/८/२०२६.
संग्रामपूर तालुक्यातील पळशी झाशी येथील कैलास मारोडे यांच्या बंद घरात अज्ञात चोरांनी घराची कलीकोंडा तोडून घरात शिरूर घरातील लोखंडी आलमारीचे लॉकर तोडून त्यातील सोन्या चांदीचे दागिने व एक लाख रोकड लंपास केलेल्या घटनेला एक आठवडा उलटून गेला असून सुद्धा अज्ञात चोरट्याचा तपास लागलेला नाही. या संदर्भात तात्काळ तपास लावा अन्यथा तामगाव पोलीस ठाण्यासमोर आंदोलन करण्याचा इशारा पळशी झाशी ग्रामस्थांनी एका निवेदनद्वारे गंगा पोलीस ठाण्याचे ठाणेदार श्रीकांत निचळ यांना देण्यात आले आहे.१९. ऑगस्ट मध्यरात्रीच्या सुमारास झालेल्या चोरीमुळे गावात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून आठवडा उलटून गेला तरी चोरीचा तपास न लागल्यामुळे ग्रामस्थ मध्ये नाराजी व्यक्त होत आहे.
पोलिसांनी लवकरात लवकर झालेल्या चोरीचा तपास लावण्यात यावा याबाबत पळशी झाशी येथील ग्रामपंचायत आणि ग्रामस्थांनी ठराव घेऊन तो जिल्हा अधिक्षकाकडे सादर केला आहे.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button