बुलढाण्यात काँग्रेसने ओढला केंद्र व राज्य सरकारच्या नाकर्तेपणावर आसूड

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस
चिखली… प्रतिनिधी
आरुणा दत्तात्रय खंडागळे
शेतकऱ्यांचे शोषण करणारी जुलुमीसत्ता उलथून टाकू : हर्षवर्धनदादा सपकाळ
बुलढाणा : शेतमालाचा जो २०१४ चा भाव होता, तो खाली गेला. डिझेल-पेट्रोलचे, गॅसचे दर गगनाला भिडले. नीटचे पेपर फुटले, खताचे दर विक्रमी किंमतीने वाढले आहेत. १ रुपयाचा पीक विमा बंद केला. पीक विम्याचे पैसे मिळणे बंद झाले. खतांची महागाई वाढत चालली, नाफेडची खरेदी बंद झाली. सोयाबीन, ज्वारी मका, कापूस खरेदी केला जात नाही. मात्र शेतमालाचे भाव हे खाली – खाली चालले आहे. आणि हे सर्व जे खाली होतेय, या सगळ्या खाली जाणाऱ्या गोष्टींचे जे पाप आहे, ते या देशाच्या पंतप्रधानांवर आहे. आपल्या देशाची उज्ज्वल संत परंपरा, सांविधानिक मूल्ये, समता, बंधुता, सामाजिक न्यायाची भूमिका घेऊन आज काँग्रेसनेते राहुल गांधी मनुवादी सरकारविरोधात संघर्ष करत असताना, आपल्याला व्हाट्सॲपवर कमेंट करून चालणार नाही. चार कमेंट करून आपल्याला थांबता येणार नाही, तर आता आपल्याला देश वाचवण्याकरता रस्त्यावर उतरावे लागणार आहे. कारण हे सरकार मुके, बहिरे आणि आंधळे आहे. आता शेतकऱ्यांचे, कष्टकऱ्यांचे, सर्वसामान्यांचे शोषण करणारी केंद्र व राज्यातली जुलूमी सत्ता उलथून टाकू, असा निर्धार काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धनदादा सपकाळ यांनी व्यक्त केला.
सोमवार १ जून रोजी नीट पेपरफुटी, पेट्रोल-डिझेल दरवाढ आणि महागाईविरोधात बुलढाणा जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने बुलढाणा शहरात आसूड मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. गर्दे हॉल ते जिल्हाधिकारी कार्यालय असा आसूड मोर्चा काढण्यात आला व मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले. तत्पूर्वी झालेल्या सभेला हर्षवर्धनदादा सपकाळ यांनी संबोधित केले. याप्रसंगी मावळते जिल्हाध्यक्ष राहुलभाऊ बोंद्रे✍️



