Uncategorized

प्रधानमंत्री घरकुल आवास योजनेचा लाभ कळंबेश्वर वाशीयांना देण्यात यावा – ऍड. संघनायक मोरे


  • वाशिम जिल्हा प्रतिनिधी
    अजय गायकवाड

वाशिम : _कळमेश्वर येथील नागरिक पंतप्रधान आवास योजने पासून वंचित ऍड. संघनायक मोरे यांचे मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद वाशिम यांना निवेदन मालेगाव तालुक्यातील ग्राम कळंबेश्वर येथील नागरिकांना यावर्षी सुद्धा पंतप्रधान आवास योजने पासून वंचित ठेवण्यात आले दरवर्षी पंतप्रधान आवास योजनेचे उद्दिष्टे वाशिम जिल्हा, तालुक्याला व तालुक्यातील ग्रामपंचायतला येत असते यामध्ये मालेगाव तालुक्यातील कळंबेश्वर गावला एकही उद्दिष्ट मिळाले नाही कळमेश्वर गावातील भूमीहीन शेतमजूर अपंग विधवा घटस्फोटीत विधुर महिला आहेत तसेच बेघर लाभार्थी सुद्धा आहेत कुडामातीचे घर करून राहत असलेल्या नागरिकांना या वर्षाच्या पंतप्रधान आवास योजनेच्या उद्दिष्टाची अपेक्षा होती परंतु सन 2024 – 25 या उद्दिष्टा मध्ये कळंबेश्वर गावाला वगळण्यात आले आहे. प्रधानमंत्री आवास योजना सुरू झाली तेव्हापासून आत्तापर्यंत कळंबेश्वर गावाला एकही उद्दिष्ट तथा लाभ मिळाला नाही व सदर योजने पासून वंचित ठेवण्यात आले आहे असे निवेदनात नमूद केले आहे कळंबेश्वर गाव जवळजवळ तीन हजार लोकसंख्येचे असलेले हे गाव त्यामध्ये गरीब वर्ग फार प्रमाणात आहे आणि अशावेळी सदर गावाला योजनेपासून वंचित ठेवले जात आहे सदर निवेदनाची कारवाई करून कळबेश्वर गावातील नागरिकांना न्याय द्यावा व उद्दिष्ट देऊन गावामध्ये पंतप्रधान आवास योजनेची काम सुरू करावे तसेच मा. प्रधानमंत्री भारत सरकार नई दिल्ली यांच्याकडे मा. जिल्हाधिकारी वाशिम यांच्यामार्फत प्रत पाठवण्यात आली , मा. जिल्हाधिकारी साहेब वाशिम यांना सुद्धा निवेदन देण्यात आले. यामध्ये वाशिम जिल्ह्यातील एससी,एसटी,ओबीसी, अपंग, विधवा, घटस्फोटीत, आदिवासी यांचा प्रामुख्याने समावेश करण्यात यावा अशी अशी बाब नमूद करण्यात आली. प्रत्येक वेळेस ज्या ज्या वेळेस गावामध्ये शेतकरी वर्गाचा प्रश्न असेल गावातील नागरिकांचे विहिरीचा प्रश्न असेल घरकुलाचा प्रश्न असतील शौचालयाची प्रश्न असतील गावातील रस्त्यातले प्रश्न असतील अशा विविध समस्यांना घेऊन संघनायक मोरे हे शासन दरबारी मांडत असतात पंतप्रधान आवास योजनेचा लाभ मिळावा म्हणून ऍड. संघनायक मोरे यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद वाशिम यांना निवेदनाद्वारे पंतप्रधान आवास योजनेचे उद्दिष्ट ग्रामपंचायत कळंबेश्वरला देण्यात यावे अशी मागणी केली आहे.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button