महाराष्ट्र

कारेगाव बु तालुका खामगावयेथे हृदयद्रावक घटना:7 वर्षीय यश अरुण बोदडे याचा नदीत बुडून मृत्यू, गावात शोककळा

( स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस प्रतिनिधी शेगाव मिलिंद चराटे)खामगाव तालुक्यातील कारेगाव बु. येथे एक अतिशय दुर्दैवी आणि हृदयद्रावक घटना घडली आहे. 7 वर्षीय यश अरुण बोदडे, जो स्थानिक शाळेत दुसऱ्या वर्गात शिकत होता, त्याचा नदीवरील पुलावरून खाली पडून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. ही घटना गावातील लोकांना हादरवून टाकणारी ठरली आहे.

यश आपल्या मित्रांसोबत खेळत असताना नदीवरील पुलाजवळ पोहोचला. खेळताना त्याचा पाय घसरला आणि तो थेट नदीपात्रात कोसळला. नदीतील पाण्याच्या वेगामुळे तो मोरीतून वाहून गेला आणि काही क्षणातच त्याचा ठावठिकाणा हरवला. गावकऱ्यांनी आणि प्रशासनाने शोधमोहीम सुरु केली, परंतु दुर्दैवाने यश बेपत्ता झाला होता. काही तासांनंतर, गावातील शोध पथकाला नदीपात्रात नवीन पुलाच्या मोरीत अडकला त्याचे मृतदेह सापडले. या हृदयद्रावक घटनेने संपूर्ण गाव शोकमग्न झाले आहे.

यश अरुण बोदडे याचा मृतदेह तात्काळ पोस्टमार्टेमसाठी रवाना करण्यात आला असून, यानंतर त्याच्या अंतिम संस्काराची तयारी करण्यात येत आहे. या दुर्घटनेने बोदडे कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. गावातील नागरिकांनीही त्यांच्या दुःखात सहभाग घेतला आहे.

गावात सध्या एकाच विषयाची चर्चा आहे – या पुलावरील सुरक्षा उपायांचा अभाव. पुलावर कोणत्याही प्रकारचे संरक्षक कठडे नसल्याने अशा घटनांची शक्यता वाढत असल्याचे ग्रामस्थांचे मत आहे. प्रशासनाने याकडे लक्ष देण्याची तातडीने मागणी करत गावकऱ्यांनी संबंधित ठिकाणी योग्य ती सुरक्षाव्यवस्था करण्याची विनंती केली आहे, जेणेकरून भविष्यात अशी दुर्दैवी घटना टाळता येईल.

यश अरुण बोदडे याच्या दुर्दैवी मृत्यूमुळे कारे गावात शोककळा पसरली आहे, आणि या घटनेने सर्वांच्याच मनाला चटका लावला आहे.यापूर्वी 13 पाइप चा पूल होता आता फक्त 3 पाइप टाकून छोटा पूल ठेकेदाराणे तयार केला आहे त्यामुळे फोर्स जास्त आहे लाकूड अडकले ते पण मुलगा मोरीत अडकण्याची कारण ठरले

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button