महाराष्ट्र

निवडणूक कार्यावरील खासगी चालक मताधिकारा पासून वंचित राहणार ?

वाशिम जिल्हा प्रतिनिधी
अजय गायकवाड

मालेगाव : -  मतदानापासून कोणताच मतदार वंचित राहणार नाही याची दक्षता घेणाऱ्या निवडणूक प्रशासनाच्या अखत्यारीत असलेल्या निवडणूक कार्यावर नियुक्त खासगी वाहन चालकानांच मताधिकार बजावण्या पासून वंचित राहावे लागणार आहे. खासगी आस्थापना वरील कामगारांना यासाठी दोन तास देण्याची तरतूदीचा लाभ मिळायला हवा.
एकीकडे निवडणूक आयोग कोणताही मतदार मतदानापासून वंचित राहू नये यासाठी बारकाईने लक्ष घालून प्रत्येक बाबीवर जनजागृती पथनाट्य व विविध प्रकारचे कार्यक्रम राबवून मतदारांनी मतदान करावे यासाठी प्रयत्न करत आहेत.

यामध्ये निवडणूक आयोगाने वय वर्ष ८५ च्या वरील मतदार व तसेच दिव्यांग मतदारही मतदानापासून वंचित राहू नये यासाठी घरपोच मतदानाची सुविधा सुरू केलेली आहे. मात्र यादरम्यान निवडणूक आयोगाच्या निवडणूक कामामुळे वाशिम जिल्ह्यातील तब्बल ३०० मतदार हे मतदानापासून वंचित राहणार आहेत. याचे कारण म्हणजे निवडणूक आयोगाच्या निवडणूक प्रक्रियेसाठी ज्या खाजगी वाहनाचा समावेश निवडणूक मध्ये मतदान केंद्रावर जाण्याकरता समावेश केलेला आहे असे खाजगी वाहनावरचे चालक हे मतदानापासून वंचित राहणार हे मात्र नक्की.
निवडणूक आयोगाने जारी केलेल्या निर्देशानुसार निवडणुकीच्या मतदानाच्या आदल्या म्हणजे १९ नोव्हेंबरला वाहन चालकांना वाहनासह ठराविक वेळ व ठराविक ठिकाणी उपस्थित राहण्याचे निर्देश दिले आहेत.
त्यामुळे निवडणूक प्रक्रियेसाठी समावेश असलेल्या खाजगी वाहनधारकांना आपले वाहन घेऊन उपस्थित राहावेच लागणार आहे. यामुळे सदर मतदार वाहन चालक हे आपल्या कर्तव्यावर असल्याने हे मतदार त्यादिवशी मतदानापासून वंचित राहणार असल्याने निवडणूक आयोगाच्या या कार्यशैलीबद्दल आश्चर्य व्यक्त केल्या जात आहे. यामध्ये तब्बल ३०० पेक्षा जास्त मतदारांचा समावेश आहे.
चौकट
खासगी आस्थापनानां मिळणारी सवलत देण्यात यावी.
निवडणूक आयोग व जिल्हाधिकारी यांनी या विषयी गांभीर्याने लक्ष घालून सदर मतदारांना आपला मताधिकार बजावण्यासाठी योग्य ती उपाययोजना केली पाहिजे. निवडणूक आयोगाच्या नियमावली नुसार खासगी आस्थापना वरील कामगारांना यासाठी दोन तास देण्याची तरतूद आहे. तोच नियम या निवडणूक कार्यावरील नेमणूक झालेल्या खासगी वाहन चालकांना लावला पाहिजे. त्यासाठी रिझर्व्ह निवडणूक कर्मचाऱ्यांच्या धर्तीवर अधिक वाहन चालकाची व्यवस्था करावी. एरवी निवडणूक खर्चाचा कोणत्याही हिशोबाचे अंकेक्षण (ऑडिट) होत नाहीच.

चौकट
प्रशासन दक्षता घेणार
मतदानापासून कोणताच मतदार वंचित राहणार नाही याची दक्षता प्रशासन घेणार आहे सहायक निवडणूक अधिकारी तथा तहसीलदार प्रतिक्षा तेजनकर यांची माहीती दिली आहे.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button