भारतीय जनता पार्टीचे नवनिर्वाचित प्रदेश उपाध्यक्ष अनिल दादा गावंडे यांचा तेल्हारा शहरात सत्कार!

तेल्हारा. दि. 7 नोव्हें. 2024 |
गत ऑक्टोंबर महिन्यात प्रहार जनशक्ती पक्षाचे प्रदेश अध्यक्ष अनिल दादा गावंडे यांनी रीतसर राजीनामा देत त्यांच्या काही सहकार्यांबरोबर दि. 26 ऑक्टोंबर 2024 ला भाजपामध्ये प्रवेश घेतला. याप्रसंगी भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी अनिल दादा गावंडे यांचे स्वागत करत त्यांना भाजपा प्रदेश उपाध्यक्ष पदी नियुक्ती देत त्यांचे स्वागत केले.
त्यानिमित्त बुधवार दि.6 नोव्हेंबर 2024 रोजी तेल्हारा शहरात सामाजिक कार्यकर्ते निलेश किसनराव पुदाके व समूह यांनी भारतीय जनता पार्टीचे नवनिर्वाचित प्रदेश उपाध्यक्ष अनिल दादा गावंडे यांच्या निवासस्थानी भेट घेऊन त्यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार केला.
याप्रसंगी ज्ञानेश्वर भाऊ मिरगे , शामभाऊ खारोडे , माळेगाव येथील देविदास विठ्ठल इंगळे , अब्दुल नबी , शेख बिस्मिल्ला शेख , संजय खेडकर , जवंजाळ भाऊ , वसीम भाऊ , शेख रईस भाऊ यांचे सह आदी सहकारी उपस्थित होते.



