गुन्हेगारीजळगावा जिल्हा

लोकसभा निवडणुक २०२४ चे अनुशांगाने नाकाबंदी दरम्यान मुक्ताईनगर पोलीसांची कामगीरी

मुक्ताईनगर:- प्रतिनिधी

प्रमोद सौंदले

जळगाव जिल्हयाचे पोलीस अधिक्षक श्री. महेश्वर रेडडी सो. यांचे आदेशाने व उपविभागीय पोलीस अधिकारी मुक्ताईनगर श्री राजकुमार शिंदे, मुक्ताईनगर पोलीस निरीक्षक नागेश मोहीते यांचे मार्गदर्शनाखाली मुक्ताईनगर पोलीस स्टेशनअंतर्गत परिवर्तन चौक येथे लोकसभा निवडणुक २०२४ चे अनुशांगाने नाकाबंदी लावण्यात आली होती. सदरचे नाकाबंदी दरम्यान नाकाबंदी पथकाचे सपोनि. संदीप धुमगहू, पो.हवा. छोटु वैद्य, पो.शि. प्रशांत चौधरी, पोशि.प्रविण जाधव, पोशि.अभिमण पाटील यांना एक संशयीत कार येताना दिसताच त्यांनी सदरची कार थांबवुन कारची तपासणी केली असता कारमध्ये भवरलाल जेठमल जैन, राह. जळगाव यांचे बॅगमध्ये २७९.७३० ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागीने कोणत्याही पावती विनापरवाना विना मिळुन आले असता फिरते पथक प्रमुख असिस्टंट इंजीनीयर अनिल नेरपगार, पंचायत समीती बोदवड यांना बोलावुन त्याचेकडे पुढील कायदेशीर कारवाईस्तव हस्तातरीत करण्यात आलेले आहे.सदरची कारवाई मा. डॉ. महेश्वर रेडडी, पोलीस अधिक्षव जळगाव, मा. श्री. अशोक नखाते, अप्पर पोलीस अधिक्षक जळगाव, राजकुमार शिंदे, उपविभागीय पोलीस अधिकारी, मुक्ताईनगर यांचे मार्गदर्शनाखाली पोनि नागेश मोहीते, सपोनि संदीप धुमगहू, पो.हवा.छोटु वैद्य, पो.शि. प्रशांत चौधरी, पोशि.प्रविण जाधव, पोशि.अभिमण पाटील नेम मुक्ताईनगर पोलीस ठाणे यांनी केली आहे.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button