महाराष्ट्र

भीषण अपघातात बाप-लेकाचा जागीच अंत

वाशिम :

मालेगाव तालुक्यातील किन्हीराजा येथे संभाजीनगर नागपूर रोड वर बिघाड झालेल्या उभ्या ट्रकला मागुन जबरदस्त धडक दिल्याने बाप-लेक हे दोघेजण जागीच ठार झाले, तर एक जण गंभीर जख्मी झाल्याची घटना २२ मार्च शुक्रवारच्या मध्यराञी  किन्हीराजा येथील शिवाजी शाळेजवळ घडली. या अपघातात नवलचंद धर्माजी वाघमारे वय ५५ वर्ष, व आशीष नवलचंद वाघमारे वय. ३३ वर्ष.दोघेही रा कानगांव जि. वर्धा हे जागीच ठार झाले, असून दादाराव निकम वय 26 हे गंभीर जख्मी झाले आहेत.
किन्हीराजा येथील शिवाजी शाळेजवळ एम एच ०४ एफ. यु.९९८३ हा ट्रक बिघाड झाल्यामुळे संभाजीनगर नागपूर या रोडवर कडेला बंद पडला होता. तर एम एच २० बी.ई. २३४४ या मोटारसायकलने तीन जण संभाजीनगर वरून वर्धा जिल्ह्यातील व हिंगणघाट तालुक्यातील कानगावकडे निघाले असता शुक्रवारच्या राञी १२:00 वाजता किन्हीराजा येथील शाळेजवळ बंद पडलेला ट्रक हा एकाच जागेवर उभा आहे की रोडवर चालु आहे याचा अंदाज दुचाकीस्वारा ला आला नाही व मोटरसायकल उभ्या असलेल्या ट्रकवर आदळली या अपघातात मोरसायकलवरील नवलचंद धर्माजी वाघमारे वय. ५५ वर्ष व आशीष नवलचंद वाघमारे वय. ३३ वर्ष रा काजगांव जी वर्धा हे दोघेही बापलेक हे जागीच ठार झाले, तर याच मोरसायकलवरील तिसरा व्यक्ती दादाराव सखाराम निकम वय. २६ वर्ष. रा संभाजीनगर हे गंभीर जख्मी झालेअसून त्यांचीही प्रकृती चिंताजनक आहे. राञी १२ वाजता अपघात होताच जऊळका पोलीसस्टेशनचे कर्मच्यारी व किन्हीराजा प्रा आरोग्य केंद्रातील रुग्नवाहीकेत चालक व इतर बरेच नागरिक जमा झाले व अपघातग्रस्तांना तातडीने वाशीम येथील रुग्णालयात दाखल केले तर गंभीर जख्मी वर वाशीम येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहे.आशीष वाघमारे हा युवक मोटरसायकल चालवीत होता अशी माहिती पोलिसांनी दिली.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button