अथातो मद्यपुराणम!सानिध्यात सत्यानाशम!

महात्मा गांधी,आण्णा हजारे आणखी सर्वच जातीधर्मातील साधु,संत, सज्जनांनी नेहमीच दारूचा तिरस्कार केला आहे.असे सर्वच स्री पुरुष सांगतात.कथा, किर्तन,पोथी,पुराणात दारूचा तिरस्कार सांगतात.शाळेच्या भिंतीवर सुद्धा गुरूजी तेच लिहून ठेवतात.तरीही ते घेतातच.म्हणून आम्ही विद्यार्थ्यांवर त्याचा चांगला परिणाम होत नाही.कदाचीत चांगला परिणाम करणारा कप्पा मेंदूत नसावा.अनेक उच्चशिक्षित, उच्चपदस्थ अधिकारी सुद्धा यांचे बळी ठरतात.तर मग, राजकीय नेते कसे वाचतील?
राजकीय भ्रष्टाचाराला कंटाळून लोकांनी केजरीवाल यांना डोक्यावर घेतले.तीन वेळा मुख्यमंत्री बनवले.भले ते दारू प्राशन करीत नसतील पण वासाने नशा चढते.त्यातून आर्थिक फायदा होतो.हा फायदा टाळता आला नाही.तितका संयम ठेवता आला नाही.म्हणून आण्णा हजारे यांचे दारू बाबत घडलेल्या घटनेचे विश्लेषण योग्यच आहे.दारुच्या विषयाला हात घातल्याने हाताला सुद्धा नशा चढते.आणि ती मस्तकात जाऊन पोहचते.
अर्थात अरविंद केजरीवाल इतर राजकीय नेत्यांपेक्षा अनेक पटीने प्रामाणिक आहेत.पण जो घात मेणकाने विश्वामित्राचा केला तोच केजरीवाल यांचा मदिराने केला.अनेक बुद्धीवंतांना या मेणका आणि मदिराने भुरळ घातली आहे.
विजय माल्या काही वाईट माणूस नव्हताच मुळी.म्हणून तर अनेक राजकीय नेत्यांनी त्यांचेशी सख्य ठेवले.पण त्यांचा व्यवसाय मात्र मती मारणारा होता.त्यातून तो बिचारा मल्या सुद्धा सुटला नाही.हद्दपार झाला.
दारू,अफू,गांजा,चरस,घुटका वगैरे पदार्थ आज जरी सरकार ने कर घेऊन विक्रीची मोकळीक दिली असली तरीही विकणारे स्री पुरुष आणि कर घेणारे सरकार सुद्धा या पापातून सुटले नाहीत.सुटणार नाहीत.
आमचा आमदार सुद्धा दारू विकतो.दारू विकणारा माणूस कितीही सज्जन असला,नम्र असला ,साधू संत असला , स्वतः तोंडातून पीत नसला तरीही दारूची नशा हातातून चढते,मस्तकात जाते.जेथे मुख्यमंत्री स्वताला वाचवू शकले नाहीत,तेथे आमदार तरी कसे वाचतील?जो जो माणूस किंवा बाई दारूच्या सानिध्यात आले ते ते बरबाद झाले.महाराष्ट्र सरकार तर खूप उदार आहे.अनेक महिलांना उधार परवाना देऊन महिला सबलीकरण करीत आहे.यातून पुरूषांच्या बरोबरीने महिलांचा विकास मोदी,शहा, शिंदे, पवार फडणवीस, ठाकरे करू पाहात आहेत.पण मद्य सानिध्यात सत्यानाशम! हे कधीही खोटे ठरणार नाही.तेथे बिचारा केजरीवाल किस गलीमे गलबला?
दारूमुळे आमचे पोलिस हे पोलिस राहिले नाहीत.बिघडले.आमदार खासदार बिघडले.नासले.रेतीमुळे आमचे महसूल खाते पुर्ण नासले.सडले.महसूलमंत्री सुद्धा.डान्सबार मुळे राष्ट्रवादी बरबाद झाली.शिव उद्योग मधील हप्ते बाजीमुळे शिवसेना धराशायी झाली.शिक्षण संस्थांमुळे कांग्रेस निष्क्रिय झाली.आता बुवाबाजी आणि थापेबाजीमुळे भाजप सुद्धा तिरस्करणीय होणारच.यातून केजरीवाल यांची सुटका नाही.मी दारू विकून दवाखाना चालवतो.असे म्हणणे धर्मशास्त्र, राजनितीशास्र मान्य करीत नाही.वदतो विसंगत आहे.अंतरकरणातील खोट आहे.
आम्ही महाराष्ट्र जागृत जनमंच कडे अशा अनेक तक्रारी येतात.दारू विरोधात.सट्टा विरोधात.रेती विरोधात.राशन विरोधात.रेती विरोधात.पण आम्ही या विषयात पडत नाहीत.कारण या गुत्त्यात,या अड्यात,या दालनात जो गेला तो जसा गेला तसा परत येत नाही.त्याची दुर्गंधी येणारच.आपण आपले नाकावर, तोंडावर रूमाल ठेवणे,इतकेच आपल्या हाती आहे.
दारू विकणारा आमदार आणि दारूचा कर घेणारा मुख्यमंत्री पुढे काय काय करणार?हे सांगण्यासाठी इडी ची गरज आहे काय? हा लेख लिहील्यानंतर माझ्या मोबाईलचा अल्कोहोलीक स्मेल येत होता.सामान्य माणसाला दारू बाटलीत दिसते.बुद्धीवंतांना ती डोक्यात दिसते.सामान्य माणसाला दारूचा वास नाकातून येतो.बुद्धीवंतांना दारूचा वास अंतरकरणातून येतो.
इति मद्यपुराणम! सानिध्यात सत्यानाशम!
… शिवराम पाटील
महाराष्ट्र जागृत जनमंच
जळगाव



