
( स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस प्रतिनिधी शेगाव मिलिंद चराटे )
महाविकास आघाडीने वंचित बहुजन आघाडीला चार लोकसभा मतदारसंघ सोडले.
अकोला
रामटेक
शिर्डी
सोलापूर किंवा मुंबई (दक्षिण)
हे ते चार लोकसभा मतदारसंघ.
महाविकास आघाडीतील पदाधिकारी डोक्यावर पडलेले आहेत का?
या लोकसभा मतदारसंघातील, अकोला मतदारसंघ वगळता रामटेक, शिर्डी, सोलापूर व मुंबई (दक्षिण) हे लोकसभा मतदारसंघ अनुसूचित जातीचे राखीव मतदारसंघ आहेत. केवळ राखीव मतदारसंघ देउन वंचित ची बोळवण करायची आहे का ❓
🔹 एससी एसटी ओबीसी बलुतेदार अलुतेदार आदिवासी व अल्पसंख्याक (मुस्लिम, ख्रिश्चन,जैन,शीख) समाज हा वंचित बहुजन आघाडीचा आधार/ प्रवाह बनलेला असतांना पध्दतशीरपणे एससी वगळून बाकी सर्व समाज वंचित बहुजन आघाडीतून काढून टाकण्याचा डाव महाविकास आघाडीने रचला आहे, हे स्पष्ट झाले आहे.
यावरून, महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांच्या नेत्यांना एड. बाळासाहेब आंबेडकर हे सर्व समाजाभिमुख नेतृत्व आहे असे वाटत नाही, असेच त्यांना दाखवावयाचे आहे.
बाळासाहेब आंबेडकरांवर ही कुरघोडी करण्याचा डाव आहे हे आता जनता समजून चुकली आहे. बाळासाहेबांना महाविकास आघाडीत घ्यावयाचेच नाही फक्त लपंडाव खेळून आघाडी न करण्याचे खापर बाळासाहेबांवर फोडायचे ही महाविकास आघाडीची क्लुप्ती आता उघड झाली आहे.
तमाम आंबेडकरी अनुयायी यांनी सतर्क राहून बाळासाहेब आंबेडकर जो निर्णय घेतील त्याचे समर्थन केले पाहिजे



