खानदेशजळगावा जिल्हा

जळगाव : कुत्र्याला वाचविण्याच्या प्रयत्नात तरुणाचा जागीच मृत्यू

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस जळगाव

| ८ जुलै २०२४जळगाव शहरात गेल्या काही दिवसापासून नेहमीच अपघाताच्या मालिका सुरु असतांना नुकतेच जळगाव ते कुसुंबा दरम्यान रात्रीच्या वेळी कामावरून घरी जात असताना रस्त्यात अचानक कुत्रा आडवा आल्याने कुत्र्याला वाचविण्याच्या प्रयत्नात दुचाकी घसरून अपघात झाला. या अपघातात तरुणाचा जागीच मृत्यू झाला.मिळालेल्या माहितीनुसार, जळगाव तालुक्यातील कुसुंबा येथील गणेश घनश्याम सोनार (वय २६) हा कुसुंबा गावात आई आणि बहिणीसोबत वास्तव्यास होता. तो जळगावात खाद्यपदार्थांच्या गाड्यांवर काम करून मिळणाऱ्या पैशातून तो परिवाराचा उदरनिर्वाह करीत होता. रविवारी रात्री उशीर सर्व काम आटोपून गणेश हा रात्री दहाच्या सुमारास जळगाववरून कुसुंबा येथे घरी जाण्यासाठी निघाला. मात्र जळगाव- संभाजीनगर महामार्गावरील विमानतळाजवळ आला. दरम्यान रात्रीच्या अंधारात महामार्गावरून दुचाकी चालवीत असताना अचानक कुत्रा समोर आल्याने त्याला वाचविण्याच्या प्रयत्नात दुचाकी रस्त्यावर घसरली. यात तो खाली पडला. यानंतर त्याला जळगावच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात आणले असता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याला तपासून मृत घोषित केले.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button