Uncategorized

विकासाचे व्हीजन, सर्व घटकांसाठीदिलासादायक बजेट : डॉ. केतकी पाटील

जळगाव जिल्हा प्रतिनिधी

आज सादर झालेल्या अंतरिम अर्थसंकल्पातून राज्यातील सर्व घटकांना न्याय देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. ग्रामसडक योजनेपासून शहरी मार्ग, चौपदरी महामार्गांसह रेल्वेमार्गांच्या भूसंपादनासाठी तरतूद करत पायाभूत सुविधांचे जाळे मजबुतीवर भर देण्यात आला आहे. निराधारांचा आधार असलेल्या संजय गांधी निराधार योजनेचे पेन्शन १ हजार रुपयांवरुन १५०० करण्यात आलेय. प्रत्येक तालुक्यासाठी शववाहिका, संत गाडगेबाबा महामंडळाची स्थापना या घोषणा सामान्यांसाठी मोठी उपलब्धी आहे. उद्योग, कृषि, क्रीडा क्षेत्रासाठी आवश्‍यक तरतुदींचा यात समावेश रोजगार उपलब्ध होणाऱ्या योजनांचाही उल्लेख आहे. जालना- जळगाव रेल्वेमार्गासाठी ५० टक्के आर्थिक सहभाग आपल्या खानदेशासाठी महत्त्वपूर्ण टप्पा आहे. एकूणच सर्वच समाज घटकांसाठी हा दिलासादायक अर्थसंकल्प आहे.

डॉ केतकी पाटील, प्रदेश उपाध्यक्षा, महिला मोर्चा, भाजपा

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button