Uncategorized
बुलढाणा अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे नुसकान झालेल्या शेतकऱ्यांना एकरी पन्नास हजार रुपयांची मदत देण्याची संदीप शेळके यांची मागणी

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस
जिल्हा प्रतिनिधी
उषा इंगळे बुलढाणा
काल बुलढाणा जिल्ह्यात झालेल्या वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस आणि गारपिटीमुळे रब्बी हंगामातील गहू, हरभरा ,मक्का, ज्वारी यासह फळबागाचे अतोनात नुकसान झाले आहे, यामुळे शेतकरी मोठा आर्थिक संकटात सापडला असून, शेतकऱ्यांच्या हाता तोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावून होऊन घेतला आहे..
त्यामुळे या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करून सरसकट शेतकऱ्यांना एकरी पन्नास हजार रुपयांची मदत द्यावी अशी मागणी वन बुलढाणा मिशनचे
संदीप शेळके यांनी
जिल्हाधिकाऱ्यामार्फत कृषीमंत्र्याकडे केली आहे…



