हिवरखेडला नगर परिषदेचा दर्जा प्राप्ति निमित्य आमदार प्रकाश भारसाकळे यांचा भव्य नागरी सत्कार व लाडुतूला!

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस विजय घोडे तेल्हारा तालुका प्रतिनिधी
हिवरखेड दि.२५: तेल्हारा तालुक्यातील हिवरखेड ग्राम पंचायत ला आता नगरपरिषदेचा दर्जा प्राप्त झाल्या असल्यामुळे हिवरखेड येथील नागरिकांचा आनंद गगनाला भिडाला असून नागरिकांनी आमदार प्रकाश भारसाकळे यांची गावभर जिप्सी गाडीमध्ये मिरवणूक काढून ठिकठिकाणी त्यांच्यावर फुलांचा वर्षाव करून सत्कार केला तर सभास्थळी आ.प्रकाश भारसाकळे यांच्यावर जेसीबी मशिनद्वारे फुलांची उधळण करून भारसाकळे यांच्या वजना इतक्या लाडूंनी तुला करून नागरिकांमध्ये वाटप करण्यात आले. गेल्या २४ वर्षापासून संघर्ष करीत आहेत येथील विविध पत्रकार संघ , व्यापारी संघ, विविध संघटना, सामाजिक कार्यकर्ते यांनी अनेक आंदोलने, आमरण उपोषने केली शेवटी अकोट मतदार संघाचे आमदार प्रकाश भारसाकळे यांना हिवरखेड नगरपरिषदे साठी साकडे घातले त्यावर आमदार भारसाकळे यांनी हिवरखेड नगरपरिषदेचा दर्जा मिळवून देण्याचे आश्वासन दिले होते त्यानंतर अवघ्या काही महिन्यातच आमदार भारसाकळे यांनी आपला शब्द पाळत हिवरखेड ग्राम पंचायत ला नगर परिषदेचा दर्जा मिळवून दिला या निर्णयाने हिवरखेडवासी यांना हा सोन्याचा दिवस पहावयास मिळाला. अशी नागरीकांमध्ये चर्चा आहे. यानिमित्त हिवरखेड येथील व्यापारी बांधव, पत्रकार संघ ,सामाजिक कार्यकर्ते व गावकऱ्यांनी आमदार भारसाकळे यांच्या भव्य नागरी सत्काराचे आयोजन दि. २४ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ५ वाजता स्थानिक चंडिका चौक येथे केले होते या सत्कार सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी जिल्हा परिषदेच्या सदस्या सुलभा रमेश दुतोंडे हया होत्या तर प्रमुख उपस्तीत राजेश रावणकार, गजानन उंबरकर, उमेश पवार, प्रवीण वैष्णव, रमेश दुतोंडे, पूजाजी मानकर, पंकज देशमुख, किरण अवताडे, शेरूभाई,डॉ संजय शर्मा, हरीश टावरी, रुपेश राठी, गोकुळा भोपळे, वैशाली वानखडे, नंदाबाई मानकर, प्रतिभा येऊल, अनिल कराळे, डॉ राम तिडके, कृष्णा तिडके, संदीप इंगळे, सुरेश नाठे, किरण सेदानी, महेंद्र भोपळे, गणेश वानखडे, प्रवीण येऊल, मोहनभाई मनसेता, मुन्नाभाई माधानी ,सुनील बजाज, आनंद बोहरा, लाला सदानी, धन्नू भाऊ टावरी, बाळासाहेब नेरकर, विनोद ढबाले, रवींद्र मानकर, रवी वाकोडे, ऍड अतुल टावरी, डॉ. शेंगोकार, केशव कोरडे, दीपक टावरी, गजानन दाभाडे, अन्सारोद्दीन बाओद्दीन, प्रमोद निळे, संजय हिवराळे यांची प्रमुख उपस्थिती होती तर या सत्कार समारंभाचे प्रास्ताविक उपसरपंच रमेश दुतोंडे यांनी केले त्यांनी आपल्या प्रास्तविकातून आमदार भारसाकळे यांच्या विकास निधीतून हिवरखेड शहरात झालेल्या विकास कामांचा लेखा जोख मांडून आमदार भारसाकळे यांना हिवरखेड तालुका करण्याची मागणी केली.यावेळी हिवरखेड वासीयांनी केलेल्या या भव्य सत्कारामुळे भावुक होऊन आमदार भारसाकळे यांनी हिवरखेड येथे विकास निधी कमी पडू देणार नसल्याची ग्वाही दिली.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महेंद्र कराळे यांनी तर आभार किरण सेदानी यांनी मानले सदर सत्कार समारंभाला असंख्य नागरिक उपस्तीत होते.



