सामाजिक
कुमारी पायल बघे हिने काढलेल्या भारताच्या नकाशालाकिशोर मासिक मध्ये प्रसिद्धी

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस
संग्रामपुर तालुका प्रतिनिधी भगवान पाखरे
जिल्हा परिषद केंद्रीय मराठी उच्च प्राथमिक शाळा कवठळ येथील इयत्ता सातवी ची विद्यार्थिनी कुमारी पायल दिनेश बघे या विद्यार्थिनीने भारत देशाचा नकाशा काढून सुंदर रंगाने रंग भरून त्याला सजवले होते शाळेतील निवडक चित्र श्री विनोद जावळे सर यांनी किशोर मासिक ला पाठविले असता त्यामधून पायल हिने रेखाटलेल्या चित्राची निवड करून त्याला प्रसिद्धी देण्यात आली किशोर हे मासिक महाराष्ट्रातील सर्व शाळेत पोहोचते आणि मुलांना खूप आवडते त्याच अनुषंगाने शाळा व्यवस्थापन समितीचे उपाध्यक्ष
बाळू पाखरे सह समिती तथा मुख्याध्यापक व शिक्षक यांनी पायल ला भेट वस्तू देऊन सत्कार करण्यात आला.



