जळगावा जिल्हाबुलढाणा

खगोल जगतातली महत्त्वाची बातमी २७ जानेवारीला पूर्व क्षितिजावर होणार अपूर्व अनुभूती. बुध व मंगळ ग्रहाच्या युतीचे होणार दर्शन ! बुध ग्रह दर्शनाची ही मोठी संधी

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस विजय घोडे तेल्हारा तालुका प्रतिनिधी

तेल्हारा दि.२५ : खगोल प्रेमीं करिता हव्या असलेल्या महत्त्वाच्या बाबी नेहमी आपल्याला स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस या वृत्त संस्थेच्या माध्यमातून अनेकदा वाचनास मिळतात व आपणही सतत उत्सुकतेने त्याची अनुभूती घेतच आहात. तर आज आपल्यासाठी खगोल विश्वातून महत्त्वाची बातमी म्हणजे ,आपला चंद्र आकाशात दररोज बारा अंश पुढे सरकत असल्याने दर महिन्याला प्रत्येक ग्रहाची आणि चंद्राची युती घडून येते त्यामुळे आकाशात ग्रहाची ओळख सहज करता येते .चंद्राप्रमाणेच ग्रह सुध्दा ठराविक कालावधीत एकमेकांच्या जवळ येतात. आपल्या सूर्यमालेत सूर्याला सर्वात जवळ असलेला बुध ग्रह आणि पृथ्वी नंतरचा मंगळ ग्रह हे दि.२७ जानेवारी २०२४ रोजी पहाटे सूर्योदयापूर्वी पूर्व क्षितिजावर युतीच्या रुपात नुसत्या डोळ्यांनी पाहता येतील.
तसेच बुध ग्रह हा सूर्याच्या जवळ आणि अंतर्ग्रह असल्याने केवळ सूर्योदयापूर्वी किंवा सूर्यास्तानंतर फार कमी वेळ या ग्रहाचे दर्शन घडते, दूर्बिणीतून या ग्रहाच्या विविध कला चंद्राप्रमाणे आपणास पाहता येतात. हल्ली आपणास ते एकादशीच्या कलेप्रमाणे दिसेल.आकाशात लालसर रंगाचा मंगळ ग्रह लवकर लक्षात येत असल्याने त्याचे आधारे बुध ग्रहाचे दर्शन अधिक सुलभ होईल. हे दोन्ही ग्रह सध्या धनु राशीत २२ व्या अंशावर आहेत.रात्री १०:०० वाजता या दोन ग्रहांमधील अंतर सर्वात कमी असेल.असा हा अनोखा आकाश नजारा प्रत्येकाने आपल्या डोळ्यात साठवुन ठेवावा अशी आहे त्यामुळे सर्वांना दर्शनाची ही मोठी संधी उपलब्ध झालेली आहे आहे या अनोख्या दृष्याचा सर्वांनी आनंद घ्यावा असे आवाहन विश्वभारती केंद्राचे प्रमुख प्रभाकर दोड यांनी केले आहे✍️

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button