महाराष्ट्रमुक्ताईनगर

मुक्ताईनगर शहरामध्ये चोवीस वर्षानंतर दहा बसेसच आमदार चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते बस ट्रायल घेत केले लोकार्पण

मुक्ताईनगर एस.टी आगारामधील एसटी बसेसची संख्या कमी असल्याने विद्यार्थ्यांची व प्रवाशांची गैरसोय तसेच संत मुक्ताई साहेबांच्या पावन चरणांनी पुनित झालेल्या या भूमीत यात्रोत्सव असेल किंवा दर पंधरवाडी एकादशी, परिक्रमा व अंतर्धान सोहळा विविध कार्यक्रमांना येणारे लाखो भाविक यांची प्रवासाची होणारी गैरसोय लक्षात घेता आमदार चंद्रकांत पाटील यांच्या सततच्या पाठपुराव्यामुळे गेल्या २४ वर्षानंतर महाराष्ट्र शासनाच्या परिवहन महामंडळाकडून नवीन “१० एसटी बसेस” मुक्ताईनगर एसटी आगारात दाखल झाल्या असून आज दि.१ फेब्रुवारी २०२५ रोजी दुपारी १२:०० वा. मा. आमदार चंद्रकांत पाटील यांच्या शुभ हस्ते सदरील बसेसचा लोकार्पण सोहळा संपन्न झाला.

तर येणाऱ्या यात्रोत्सवा पूर्वीच आमदारांनी मुक्ताईनगर आवारात १० नव्या बसेस आणून भाविक व वारकऱ्यांना मोठे गिफ्ट दिल्याचे अनेक नागरिकांकडून बोलले जात आहे. यावेळी शिवसेना उपजिल्हा प्रमुख छोटू भोई, भाजप तालुका अध्यक्ष प्रफुल्ल जावरे, युवा सेना जिल्हाप्रमुख पंकज राणे, नितीनकुमार जैन आदींसह शिवसेना युवासेना, भाजप पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच एस टी महामंडळ आगार प्रमुख व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आमदार चंद्रकांत पाटील यांनी स्वतः बस डेपो पासून ते नवीन आदिशक्ती मुक्ताई मंदिरापर्यंत बस मध्ये प्रवास करून नवीन बसेस बाबत जाणून घेतले व प्रवाशांना त्रास होणार नाही याबाबत

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button