जय श्रिराम नामाच्या जयघोषाने दुमदुमली हिवरखेड नगरी,श्रीराम शोभा यात्रा समीती कडुन कारसेवकाचा सत्कार

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस विजय घोडे तेल्हारा तालुका प्रतिनिधी.
हिवरखेड दि.२३ ; तेल्हारा तालुक्यातील हिवरखेड येथे श्रीराम शोभा यात्रा समीती, सर्व हिंदुत्ववादी संघटनांकडून तसेच विवीध गणपती मंडळ, नवदुर्गा मंडळ, सामाजिक संस्था विश्व हिंदू परिषद ,बजरंग दल, प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय सदस्य ,श्रीराम शोभायाञा समीती, विविध पक्षाचे कार्यकर्ते ,सामाजिक कार्यकर्ते आजच्या प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमात सहभागी होऊन श्रिराम जन्मस्थानी उत्सव साजरा होताना सकाळी बारा ते ऐक च्या दरम्यान मोठे राम मंदीर हिवरखेड येथे श्रीराम नामाचा जप केला तसेच अयोद्या कारसेवेत सहभागी कारसेवकाचा श्रीराम शोभायाञा समीती कडुन श्रीराम प्रतीमा व केशरी टोपी, ऊपरने देऊन समीतीकडुन सत्कार करन्यात आला तसेच सध्यांकाळी राममंदीर,चंडीका चौक मोठे बारगण श्रीरामसेना, हनुमान मंदीर भवानीमंदीर, ओमशांती शाखा, शंकर सस्थांन देवळीवेस,शिवाजी महाराज चौक, विठ्ठल मंदीर गजानन महाराज मंदीर, येथे रामनामाचा गजर करत महाआरती मध्ये समस्त हिंदुबांधव रामभक्तांनी भाग घेतला .
आजचा हा ऊत्सव घरोघरी ,गल्लो गल्ली साजरा करून रामज्योत लावून आपला परिसर दीपज्योतीने प्रकाशमय केला ,तर बालाजी मंदीरात भागवताचार्य पंडीत त्रिलोकीनाथ शास्ञी यांचे अधिपत्याखाली श्रीराम जानकी लखन हनुमान मुर्ती प्राण प्रतीष्ठा करन्यात आली राजस्थानी समाज बांधवाकडुन महाप्रसादाचे वितरण करन्यात आले तर प्रत्येक मंदीरावर रामप्रसादी लाडू चे वीतरण दर्शनार्थी ना राञी १०:०० वा. पर्यंत करन्यात आले गेल्या चार दिवसापासुन विश्व हिंदू परिषद , बजरंगी कार्यकर्त्यांच्या व नागरीकांच्या परिश्रमाला यश प्राप्त झाले असे म्हणता येईल. हा कार्यक्रम उत्साहात पारपडला म्हनुन आभार प्रदर्शनातुन कौतुक व गौरव करन्यात आले या कार्यक्रमाकरिता हिवरखेड मध्ये ठाणेदार पांडव ,दूय्यम ठाणेदार गोपाल दातीर ,बीट जमदार महादेव नेवारे यांच्या आखत्यारीत चोक बंदोबस्त लावण्यात आला होता.



