Uncategorized

भोंनगाव नगरीत रंगला भाविकांचा मेळा

भोंनगाव नगरीत रंगला भाविकांचा मेळा

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस

श्याम पहूरकर

शेगाव तालुक्यातील भोंनगाव येथे निर्मल नगरी नागपूर येथील पायी दिंडी सोहळा दिनांक 14 जानेवारी पार पडला असून यात सुमारे 3000 भाविकांचा समावेश होता 11 जानेवारी ला सुरू झालेला पालखी सोहळा नागपूर मार्गे नांदुरा आसलगाव, जळगाव जामोद वरून 12 तारखेला पेसोडा येथे पोहचला रात्रीचा मुककम पेसोडा येथे होता सर्व गावकरी मंडळी तर्फे रात्री महाप्रसादाचे आयोजन करून त्यानी पेसोडा वासीयांनी निवासाची उत्तम व्यवस्था केली होती नंतर 13 तारखेला सकाळी 8 वाजता पालखी पेसोडा येथून भोंनगाव येथे मार्गास्थ झाली व 8:30 ला भोंनगाव येथील पूर्णा नदी पात्रात पोहचली तेथे पोहचल्या नंतर पूर्णा नदीत श्री चा अभिषेक व महाआरती करण्यात आली पात्रात 3000 भाविक एकत्र आल्याने पत्रात जणू भक्तांचा मेळा भरल्या सारखे वाटत होते, नंतर नदी पत्रातील मोकळ्या जागेत अनेक भाविकांनी ताल सुरात भजन, अभंग गायन केले, फुगड्या, गोल रिंगण, करून मनसोक्तपणे आनंद लुटला ,नंतर पालखी भोंनगाव नगरीत येऊन भुवनेश्वर महादेब मंदिरात त्यांची चहा नाश्त्याची व्यवस्था करण्यात आली होती ,नंतर तेथून पालखी 3000 भविकासह भोंनगाव येथील मेंटशिवार येथे असलेल्या श्री संत गजानन महाराज मंदिर, येथे 11 वाजता पोहचली तेथे मंदिर सेवा समिती तर्फे पालखीचे भव्य स्वागत करण्यात आले, यामध्ये प्रामुख्याने दिंडी प्रमुख सुनील बालपांडे यांचे स्वागत मंदिराचे व्यवस्थापक श्रीकृष्ण भारसकळे व पोलिस पाटील सौ ज्योती भारसाकले यांचे हस्ते करण्यात आले व इतर भाविकांचे हे स्वागत विठ्ठल साबळे, स्वप्नील शेळके, गजानन खूपसे, सागर पाखरे, रवींद्र फरफट, रामकृष्ण काळे व सेवा समिती च्या अनेक सदस्यांनी स्वागत केले नंतर महाआरती पूनाजी भारसकळे व सौ मनकर्ना भारसकळे या दाम्पत्याने केली असून नंतर सर्व भाविकांना शेगाव कचोरी ,खोबरा लाडू चे वितरण करण्यात आले या अन्न दनसाठी भोंनगाव व येउलखेड येथील भाविकांनी मोलाचे सहकार्य केले असून नंतर पालखी जानोरी मार्गे शेगाव येथे मार्गस्थ झाली

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button