बुलढाणामलकापूरमहाराष्ट्र

पतंजलि परिवार बुलढाणा जिल्ह्याच्या वतीने जिजामाता व स्वामी विवेकानंद जयंती सोत्साह संपन्न*

*पतंजलि परिवार बुलढाणा जिल्ह्याच्या वतीने जिजामाता व स्वामी विवेकानंद जयंती सोत्साह संपन्न*

स्टार भारत लाइव एक्सप्रेस बुलढाणा जिल्हा ग्रामिण प्रतीनीधी ऋषिकेश देठे *शेगाव – जिजामाता यांची 426 वी जयंती तथा स्वामी विवेकानंद यांची 161 वी जयंती बुलढाणा जिल्हा पतंजलि परिवाराच्या वतीने सह केंद्रीय प्रभारी युवा भारत स्वाभिमान रितदेव महाराज यांच्या अध्यक्षतेखाली मथुरा लॉन्स शेगाव येथे दिनांक 12 जानेवारी 2024 ला सकाळी 7 वाजता साजरी झाली. प्रल्हाद सुलताने प्रांत सहकोषाध्यक्ष, डॉ. ज्ञानेश्वरजी मिरगे, दिलीप जी इंगळे सेवानिवृत्त गटविकास अधिकारी, चतुर्भुजजी मिटकरी जिल्हा प्रभारी भारत स्वाभिमान, विनायकराव भारंबे जिल्हा प्रभारी सोशल मीडिया, हरिदासजी सोळंके जिल्हा प्रभारी युवा भारत, निळकंठजी साबळे कोषाध्यक्ष, बाबुरावजी रोकडे महामंत्री, कल्पनाताई मसने महाराष्ट्र महिला आघाडीच्या कार्यकारणी सदस्या व वर्षाताई सरप तालुका महिला प्रभारी यांच्या उपस्थितीत संपन्न झाला. माॅ जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या कार्याची महती डॉ. ज्ञानेश्वरजी मिरगे यांनी विशेष केली. ज्ञानेश्वरजी साखरे यांची शेगाव शहर भाजपाच्या शहर अध्यक्षपदी फेर निवड व शेगाव रेल्वे स्थानक सल्लागार समितीच्या सदस्य पदी निवड झाल्याबद्दल, अरविंदजी इंगळे यांची बुलढाणा जिल्हा भाजपच्या सरचिटणीस पदी निवड व शेगाव रेल्वे स्थानक सल्लागार समितीच्या सदस्य पदी निवड झाल्याबद्दल, सौ. कल्पनाताई मसने यांची बुलढाणा लोकसभा मतदारसंघात महिला आघाडीत निवड झाल्याबद्दल युवा भारतचे सहकेंद्र प्रभारी स्वामी रितदेवजी महाराज यांच्या हस्ते शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. स्वामी रितदेवजी यांनी सर्व उपस्थितांना आशीर्वचन दिलेत. सकाळचे योग सत्र स्वामी रितदेवजी महाराजांनी घेतले. प्रास्ताविक व संचालन प्रल्हाद सुलताने यांनी केले. आभार प्रदर्शन वनश्री विठ्ठलराव मिरगे यांनी केले. त्यांचा सत्कार महाराजा रितदेव महाराजांनी केला. शांती पाठाने सभेचे समापन झाले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी पतंजली परिवार शेगावच्या योगसाधक व साधिकांनी परिश्रम घेतले.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button