अवकाळी पावसाने मृत पशुधनाच्या मालकांना आ.अँड.फुंडकर यांच्या शुभहस्ते धनादेश वितरितखामगाव ::-

स्टार भारत लाइव एक्सप्रेस बुलढाणा जिल्हा ग्रामिण प्रतीनीधी ऋषिकेश देठे
अवकाळी पावसामुळे मृत पावलेल्या पशुधनाच्या 40 मालकांना आज आ अँड आकाश फुंडकर यांचे शुभहस्ते धनादेश वितरित करण्यात आले.
खामगाव व शेगाव तालुक्यात अवकाळी पावसाने शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठे नुकसान झाले. त्याचप्रमाणे मोठ्या संख्येने शेळी, मेंढी, गाय, म्हशी,बैल व इतर पाळीव प्राणी मृत्युमखी पडल्या होत्या. अश्या खामगाव व शेगाव तालुक्यातील 40 पशुधन मालकांना आ अँड आकाश फुंडकर यांचे शुभहस्ते स्थानिक विश्राम गृहावर धनादेश वितरित करण्यात आले. यामध्ये विठ्ठल मेहांदे रा. शेगाव, पोपटराव कोकरे, शे रौफ शेख सत्तार गणेशपुर, स्वप्नील मदने, सुभाष पारखे, मारोती पारखे, विनोद पारखे, पृथ्वीराज हटकर, गोविंदा हटकर हिवरखेड, गणेश हटकर दोंडवाडा, रमेश हिवराळे निरोड, राजू बीचुकले, संजय बिचुकले, दादाराव बिचुकले, रतन बीचुकलें, मांगोजी बीचुकले कुंबेफळ, संजय राऊत, प्रल्हाद सोळंके, शालिग्राम सोळंके आवार, ज्ञानेश्वर माने, योगेश ठोंबरे, विजय कोळपे कोंटी, जिजाबाई वानखेडे जयराम गड, अजाबराव कोळपे, विलास हटकर, राजू कोळपे, निलेश हटकर नांद्री, रमेश भिवते दिवठाना, पवन हटकर शिराळा, रामा कोरडकर निमखेड चींचपुर, निंबाजी लाहुडकर वाकुड, पुरुषोत्तम घड्याळे, भगवानसिंग साबळे नागझरी बू., शांताराम वानखेडे लाखनवाडा, तुकाराम काळंगे भालेगाव, कैलास इंगळे वरणा व शिवाजी चव्हाण रा. शिरला यांना आ अँड आकाश फुंडकर यांचे शुभहस्ते धनादेश वितरित करण्यात आला. यावेळी तहसीलदार अतुल पाटोळे, यांचेसह विविध गावचे सरपंच उपसरपंच उपस्थित होते.



