विविध ठिकाणी भुमीपुजन
*स्टार भारत लाइव एक्सप्रेस बुलडाणा जिल्हा ग्रामीण प्रतिनिधि ऋषिकेश देठे*
पशुवैद्यकीय दवाखाना श्रेणी एक नांदुरा बांधकामाचा भुमिपूजन समारंभ आज रोजी माननीय आमदार श्री.राजेशभाऊ एकडे यांचे शुभ हस्ते पार पडला, नांदुरा येथील पशुवैद्यकीय दवाखाना पूर्णपणे जीर्ण झाला असून या ठिकाणी तालुक्यातील बरेच शेतकरी आपल्या जनावरांना उपचारासाठी आणतात त्यांना सर्व सोयीयुक्त पशुवैद्यकीय दवाखाना या माध्यमातुन उपलब्ध होणार आहे, असे मनोगत यावेळी आमदार महोदयांनी व्यक्त केले.
या प्रसंगी सर्वश्री भगवान धांडे,वसंतराव भोजने, डॉ,प्रदीप हेलगे, संजय चोपडे, पुरुषोत्तम झालटे,नितीन मानकर, तहसिलदार मुकुंदे, गट विकास अधिकारी समाधान वाघ, डॉ.विष्णु दळवी,पशुधन विकास अधिकारी (वि) पंचायत समिती,नांदुरा डॉ.अरुण शिंदे,पशुधन विकास अधिकारी, श्री.डी.बी.राठोड, सहाय्यक पशुधन विकास अधिकारी श्री.ए.बी.कांबळे,सहाय्यक पशुधन विकास अधिकारी श्री.पी.आर.खराटे,पशुधन पर्यवेक्षक श्री.सचिन साठे, पशुधन पर्यवेक्षक,श्री.एस.डी.वाणी,पशुधनपर्यवेक्षक,श्री.जे.डब्ल्यू.फाळके,परिचर,श्री.पी.एच.डाबेराव, परिचर,श्री.बी.व्ही.पाटील,परिचर श्री.व्ही.डी.माळी यांच्यासह अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.











