विदर्भसामाजिक

तेल्हारा शहरामध्ये श्रीरामप्रभुंचा जागर! व कारसेवकांच्या सन्मानार्थ सत्कार सोहळ्याचे आयोजन!

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस विजय घोडे तेल्हारा तालुका प्रतिनिधी-

तेल्हारा दि. १८ : तेल्हारा शहरांमध्ये प्रहार जनशक्ती पक्षाचे प्रदेशाध्यक्ष तथा लोकजागर मंच चे संस्थापक अध्यक्ष अनिल भाऊ गावंडे यांच्या मार्गदर्शनाखाली शनिवार दिनांक २० जानेवारी २०२४ रोजी शहरातील गजानन नगर स्थित श्री हनुमान मंदिराजवळ सुप्रसिद्ध प्रेरक प्रवक्ता ,गायक , भजनकार श्री. चंद्रकांतजी तिवारी यांचे संगीतमय व्याख्यान व कारसेवकांच्या सन्मानार्थ सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.
प्रभु श्रीरामांच्या श्री विग्रहाचा प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या सन्मानार्थ लोकजागर मंचचे संस्थापक अध्यक्ष व प्रहार जनशक्ती पार्टीचे प्रदेश अध्यक्ष अनिलभाऊ गावंडे यांच्या मार्गदर्शनाखाली या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून दि. २२ जानेवारीला अयोध्येत श्रीराम जन्मभूमी मंदिरात श्रीरामलल्लाजींच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या पावन पर्वावर प्रहार जनशक्ती पार्टी व लोकजागर मंचच्या वतीने तेल्हारा शहरातील
हनुमान मंदिर, गजानन नगर येथे रात्री ०७:३० वाजता भगवान श्रीरामांच्या भव्यतेचे आणि सभ्यतेचे गुणगौरव कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. कार्यक्रमाला मुख्य प्रवक्ता म्हणून अकोट येथील चंद्रकांतजी तिवारी उपस्थित राहणार आहेत. आपल्या संगीतमय व्याख्यानाच्या माध्यमातून प्रभू श्रीरामांचा जागर कार्यक्रमातून होणार आहे तसेच अयोध्येत रामजन्मभूमीमध्ये प्रभू श्रीरामांचे भव्य मंदिर निर्माण व्हावे याकरिता ज्या कारसेवकांनी मोलाचे योगदान दिले अशा सर्व कारसेकांच्या सन्मानार्थ लोकजागर मंचचे संस्थापक अध्यक्ष व प्रहार जनशक्ती पक्षाचे प्रदेशाध्यक्ष अनिल गावंडे यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम संपन्न होणार आहे

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button