
स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस
जिल्हा प्रतिनिधी
उषा इंगळे बुलढाणा
शेतकरी, शेतमजुरांसह सर्वसामान्य अडचणीतून जात आहेत. बेरोजगारी मोठी आहे. युवकांना रोजगार मिळणे गरजेचे आहे. जिल्ह्यात मोठे प्रकल्प, कंपन्या नाहीत. रोजगाराचा प्रश्न गहन झाल्याने युवकांना बाहेरच्या जिल्ह्यात रोजगारांकरिता भटकंती करावी लागते, हीच मोठी शोकांतिका आहे. त्यासाठी जिल्ह्यात एमआयडीसी उभारण्याचे काम आपल्याला करावे लागणार आहे. जिल्ह्याच्या हजारो, लाखो भूमिपुत्रांना स्व जिल्ह्यातच रोजगाराची व्यवस्था करण्याचे प्रयत्न करावे लागतील, असे प्रतिपादन राजश्री शाहू परिवाराचे अध्यक्ष संदीप शेळके यांनी केले.
मेकर तालुक्यातील जानेफळ येथे शनिवारी वन बुलढाणा मिशन अंतर्गत ‘जाहीरनामा जनतेचा ‘त कार्यक्रमांतर्गत संवाद मेळावा पार पडला. याप्रसंगी जिल्ह्याचा शाश्वत विकास, बेरोजगारांना रोजगार, सूचना सह शेतकरी, कष्टकरी व सर्वसामान्यांच्या विविध प्रशासनांना हात घालत संदीप शेळके यांनी मार्गदर्शन केले. या सर्व समस्या मार्गी लावण्यासाठी राजकीय चळवळीत सहभागी शिवाय पर्याय नसल्याचे त्यांनी संबोधित करताना नमूद केले. सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने राज्यात बुलढाणा जिल्ह्याचे नाव अग्रभागी असावे, ही महत्वकांक्षी संदीप शेळके यांनी बोलून दाखवली. ते म्हणाले ,प्रत्येक
विषयांवर चिंतन, मंथन करण्याची गरज आहे. जिल्ह्यात सात एमआयडीसी आहेत. यापैकी तीन जेमतेम सुरू आहेत. उद्योग उभारले तर, भूमिपुत्रांना येथे रोजगार मिळेल. जिल्ह्यात एक तरी पाच, दहा हजार लोक काम करू शकतील या क्षमतेची प्रशस्त कंपनी आहे का? ही खंत ओळखण्याची आज गरज आहे. प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी एमआयडीसी उभारल्यास बेरोजगारी निश्चित दूर होऊन युवा वर्गाची भरभराट होण्यास हातभार लागेल आणि या दृष्टीने भविष्यात आपले प्रयत्न असतील, असे त्यांनी सांगितले.
जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासाकरिता राजकीय इच्छाशक्ती महत्त्वाची आहे. शेतकऱ्याला सिंचनाची सोय झाली पाहिजे. फळ पिके, फुल पिके वाढले पाहिजे, प्रक्रिया उद्योग व्हावेत, प्रोसेसिंग युनिट वाढले पाहिजेत, शेतकरी कष्टकरी आणि सामान्य जनता सुखी होण्याकरिता राजकीय इच्छाशक्ती हवी आहे.
लोणार मध्ये देश, विदेशातून पर्यटक येतात. हेच ऐतिहासिक ठिकाण दुसरीकडे असते, तर त्याचा विकास होऊन हजारोंना रोजगार मिळाला असता. तेथे अस्वच्छता आहे, पर्यटकांना येऊ वाटत नाही. आले तर राहू वाटत नाही. चांगले कार्टून नाही. जिल्ह्यात जल प्रकल्प आहेत, अभयारण्य आहेत, तेथे चांगली पर्यटन स्थळे होऊ शकतात, असेही संदीप शेळके म्हणाले.
तरुण मुले, मुली सैन्य, पोलीस भरतीसाठी जीव धोक्यात घालून रस्त्याने धावतात. त्यांच्यासाठी क्रीडांगण असू नये का? गावात लायब्ररी असू नये का? युवक, युवती गावातील छोट्याशा लायब्ररीमध्ये जाऊन यूपीएससी, एमपीएससीची तयारी करून उच्च पदस्थ अधिकारी होऊ शकत नाहीत का? असे अनेक प्रश्न तत्परतने सोडवण्याची गरज देखील त्यांनी प्रतिपादित केली.
याप्रसंगी गजानन तात्या कृपाळ, विश्वासराव सवडतकर, हींमतराव आवले, डगडाळे, सचिन गवई, अमर राऊत, प्रदीप मावळ, नागेश डवंगे, अनिल वाळूकर, मोहन पाटील यांच्यासह युवावर्ग, महिला व पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते.
जनता अर्थात मतदार, नागरिक सर्वोच्च आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी स्वातंत्र्य, समता, न्याय, बंधुता यावर आधारलेली घटना तयार केली. त्या घटनेनुसार प्रत्येकाला सारखा अधिकार आहे. जनतेचे नेत्यांवर आपले ‘वजन ‘ठेवले पाहिजे. मात्र, येथे उलटेच घडत आहे. नेते जनतेवरच दबाव ठेवतात, धाक दाखवतात, दडपशाही करतात. लोकशाही आहे की लोकशाही याचा जाब विचारला पाहिजे. तुमचा दवा नेत्यांवर आला पाहिजे असेही संदीप शेळके यांनी यावेळी ठासून सांगितले दादागिरी हुकूमशाही मोडीत काढण्याचे आवाहन त्यांनी केले.
जन समस्या नोंदविण्यासाठी बुत जन समस्या जाणण्यासाठी गावोगावी बुत लावले आहेत. तुम्ही तिथे आमच्याकडे सूचना नोंदवा. पक्ष पक्षांचा जाहीरनामा आणतात, मी जनतेचा जाहीरनामा आणला आहे. बँकेत जातो, भगिनींच्या वेदना ऐकतो, तेव्हा मनाची कासावीस होते, त्यांच्या वेदना स्वस्थ बसू देत नसल्याचे ते यावेळी म्हणाले.



