गुन्हेगारीमहाराष्ट्र

सुलभ शौचालयाजवळ एका इसमाचा मृतदेह आढळला

सुलभ शौचालयाजवळ एका इसमाचा मृतदेह आढळला

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस शेगाव प्रतिनिधी श्याम पहूरकर शेगाव | स्थानिक सुलभ शौचालयाजवळील भवानी पार्किंग येथे ५० वर्षीय अनोळखी इसमाचा मृतदेह आढळून आला आहे. काल २० सप्टें. रोजी सदर सुलभ शौचालयाजवळ एका इसमाचा मृतदेह नागरिकांना दिसून आला. नागरिकांनी याबाबतची माहिती शेगाव शहर पोलिसांना दिल्यावरून पोलिसांनी घटनास्थळी येवुन पंचनामा केला. याप्रकरणी सुलभ शौचालयाचे सिंधू सिंगेसर सहली(५०) यांनी शहर पोस्टेला दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी कलम १७४ जाफौ नुसार मर्ग दाखल केला आहे. सदर इसमाच्या अंगामध्ये गुलाबी रंगाचे शर्ट ज्यावर काळसर प्राण्याचे चित्र, पायात काळसर रंगाची फुलपॅन्ट, अर्ध टक्कल, काळे पांढरे मोठे केस, दाढी काळी-पांढरी वाढलेली अशा वर्णनाच्या इसमाचे ओळख पटविण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button