गुन्हेगारीबुलढाणा

अल्पवयीन मुलीला फूस लावून पळवून नेले

अल्पवयीन मुलीला फूस लावून पळवून नेले

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस शेगाव प्रतिनिधी श्याम पहूरकर

शेगाव | प्रेमसंबंधातून १७ वर्षीय मुलीला फूस लावून पळवून नेल्याची घटना तालुक्यातील तरोडा कसबा येथे उघडकीस आली. याप्रकरणी मुलीच्या पित्याच्या तक्रारीवरून युवकासह ४ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तरोडा येथील एका १७ वर्षीय मुलीचे गावातीलच आकाश राजू सुर्वे याच्यासोबत प्रेमसंबंध असून ती २२ सप्टेंबर रोजी अचानक घरून गायब झाली. यामूळे तिच्या वडीलांनी आकाश याच्या घरी जावून पाहणी केली असता तो देखील घरी मिळून आला नाही.

यामुळे याबाबत मुलीच्या वडीलांनी खामगाव ग्रामीण पोस्टेला तक्रार दिली असून स्थावर पोलिसांनी आकाश राजू सुर्वे, दिनकर गोंडूजी शेगोकार व संघपाल अशोक शेगोकार यांच्याविरूध्द कलम ३६३. ३६६, ३४ भादंविनुसार गुन्हा दाखल केला आहे.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button