बुलढाणामहाराष्ट्र

बुलढाण्यात आज सकल मराठा समाजाचा विराट मोर्चा! जरांगे पाटलांचे कुटुंबीय होणार सहभागी! पोलिसांनी बंदोबस्तासाठी बाहेर जिल्ह्यातून बोलावली अतिरिक्त कुमक

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस
जिल्हा प्रतिनिधी
उषा इंगळे बुलढाणा

सकल मराठा समाजाचा विराट मोर्चा ,आज १३ सप्टेंबर रोजी बुलढाणा शहरात निघणार आहे. जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथे जरांगे पाटलांनी सुरू केलेल्या उपोषण स्थळी लाठीचार्ज झाल्याने मराठा बांधव संतप्त झाले आहेत. मराठा आरक्षण मिळेपर्यंत आता मागे हटायचे नाही असा निर्णय आता मराठा समाजाने घेतला आहे. त्या अनुषंगाने होणाऱ्या आजच्या मोर्चाची जय्यत तयारी झाली असून बुलढाण्यात लाखो मराठा बांधव जमणार आहेत.

शहरात मोठी गर्दी जमणार असल्याने पोलिसांनी तगड्या पोलीस बंदोबस्ताचे नियोजन केले आहे. १ एस पी २, अप्पर पोलीस अधीक्षक, ६ डीवायएसपी, १०० पोलीस निरीक्षक मोर्चाच्या बंदोबस्तावर नजर ठेवणार आहेत. यादी २०१६ ला झालेला मोर्चा अतिविरा ठरला होता, आजचा मोर्चाला देखील मराठा बांधवांचा जनसागर उसळला आहे.
आज होणाऱ्या मोर्चाला जरांगे पाटलांचे कुटुंबीय उपस्थित राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे मोर्चाचे महत्त्व वाढणार आहे. प्राप्त झालेल्या माहितीनुसार जरां गे पाटलांची मुलगी या मोर्चाला संबोधित करणार आहे.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button