बुलढाणामहाराष्ट्र

वाढत्या कर्जामुळे शेत विकले

वाढत्या कर्जामुळे शेत विकले
तरी कर्ज फिटेना….
अंतरी कोळी च्या शेतकऱ्यांनी टोकाचा निर्णय घेतला…

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस
बुलढाणा प्रतिनिधी
उषा इंगळे बुलढाणा

चिखली तालुक्यातील अंत्री कोळी येथील एका शेतकऱ्याने कर्जबाजारीपणाला कंटाळून आत्महत्या सप्टेंबरला ही घटना घडली. मदन त्र्यंबक शिंदे (५०) असे आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे.

मदन शिंदे यांनी मुलीच्या लग्नासाठी कर्ज घेतले होते. त्याच्यावर बँकेचे व काही खाजगी कर्ज होते. सततच्या नापिकीमुळे कमी उत्पन्न होत असल्याने त्यांना कर्ज फेडणीसाठी अडचणी येत होत्या. त्यामुळे कर्ज कशे फेडावे या विवंचनेत ते होते. या विवंचनेतच मदन शिंदे यांनी गावातील समाधान मोरे यांच्या टीन शेडला असलेल्या लोखंडी अँगल ला गळफास घेऊन आत्महत्या केली. रायपूर पोलीस ठाण्यात याप्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button