जळगावा जिल्हामहाराष्ट्रशैक्षणिक

डॉ.उल्हास पाटील इंग्लिश मिडीयम स्कूल, सावदा येथे शिक्षक दिवस साजरा सावदा

डॉ.उल्हास पाटील इंग्लिश मिडीयम स्कूल, सावदा येथे शिक्षक दिवस साजरा सावदा – डॉ. उल्हास पाटील इंग्लिश मिडियम सी.बी.एस.ई. स्कूल, सावदा येथे दि. ०५/०९/२०२३ मंगळवार यादिवशी विद्यार्थ्यांनी शिक्षक दिनाचे आयोजन केले होते. ५ तारखेला सकाळी शाळेची सुरूवात झाल्यापासून शाळा सुटेपर्यंतचा सर्व शाळेचा कार्यभार विद्यार्थ्यांनीच सांभाळला आणि प्राचीन काळापासून चालत आलेल्या गुरू-शिष्य परंपरेचा आदर्श दाखविला. तसेच इयत्ता १० वीच्या विद्यार्थ्यांनी आपल्या गुरूंचा म्हणजे शिक्षकांचा सन्मान करण्यासाठी एका छोट्या सत्कार सोहळ्याचे आयोजन केले होते. त्यात प्रत्येक शिक्षकांना पुष्पगुच्छ व भेट वस्तू देऊन गौरविले. त्यादिवशीच्या शाळेच्या प्राचार्या विद्यार्थिनी तन्मयी लासुरकर हिने आपली जबाबदारी सांभाळली. त्यादिवशी नॅशनल एज्युकेश पॉलिसी वर एक छोटीशी नाटिका सादर करण्यात आली. शिक्षकांप्रती आदर व्यक्त करण्यासाठी एक नृत्य सादर केले गेले आणि शिक्षकांप्रती आदर व्यक्त करत विद्यार्थ्यांनी शिक्षकांसाठी हा कार्यक्रम साजरा केला. याचदिवशी शाळेच्या प्राचार्या भारती महाजन यांना रोटरी क्लब तर्फे उत्कृष्ट मुख्याध्यापिका हा पुरस्कार तर पर्यवेक्षिका मंगला कांबळे यांना उत्कृष्ट पर्यवेक्षिकेचा पुरस्कार मिळाला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन इयत्ता दहावीतील विद्यार्थिनी आर्या कानडे यांनी केले. अतिशय आनंदी वातावरणात शिक्षक दिन हा कार्यक्रम साजरा करण्यात आला.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button