रावेर लोकसभा अंतर्गत मलकापूर येथे भाजपा तथा महायुती उमेदवारांसाठी गृहमंत्री श्री. अमितभाई शाह यांची भव्य सभा संपन्न…

मलकापूर येथे रावेर लोकसभा अंतर्गत मलकापूर विभानसभा तसेच बुलढाणा जिल्ह्यातील महायुती अधिकृत उमेदवार यांच्या प्रचारार्थ आज देशाचे कणखर गृहमंत्री श्री. अमितभाई शाह यांची भव्य सभा संपन्न झाली. यावेळी केंद्रीय राज्यमंत्री श्री.प्रतापरावजी जाधव व केंद्रीय राज्यमंत्री श्रीमती रक्षाताई खडसे प्रमुख उपस्थितीत होते.
यावेळी उपस्थित प्रचंड जनसमुदायासोबत संवाद साधून सर्वांनी पुन्हा एकदा राष्ट्र निर्मितीला, राज्याच्या विकासाला, प्रगतीला साथ द्यावी, महायुतीला साथ देऊन प्रधानमंत्री श्री.नरेंद्र मोदीजी यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्रात सरकार स्थापन करण्यासाठी महायुतीच्या सर्व उमेदवारांना विक्रमी मताधिक्याने विजयी करावे असे आवाहन करण्यात आले.
यावेळी गृहमंत्री श्री.अमितभाई शाह यांच्यासह केंद्रीय राज्यमंत्री श्री.प्रतापरावजी जाधव, केंद्रीय राज्यमंत्री श्रीमती रक्षाताई खडसे, मध्यप्रदेश मंत्री श्री.विश्वासजी कैलाश सारंग, खंडवा खासदार श्री.ज्ञानेश्वरजी पाटील, माजी खासदार श्री.अजयजी संचेती तसेच भारतीय जनता पार्टी व महायुतीचे बुलढाणा जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.



