दि 8 सप्टेंबर 2023 ला तेल्हारा बंद

दि 8 सप्टेंबर 2023 ला तेल्हारा बंद
( सकल मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने तेल्हारा बंदचे आव्हान)
स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस तेल्हारा तालुका प्रतिनिधी व्ही एम घोडे
तेल्हारा दि.7 जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी गावातील आंदोलन कर्त्यांना पोलिसांनी घेराव घालुन अमानुष लाठी चार्ज करून गोळीबार केल्याबद्दल सकल मराठा क्रांती मोर्चा च्या वतीने बंदचे आवाहन करण्यात आले आहे या बंदला तेल्हारा शहरासह विविध शहरांचा व शहरातील संघटनांचा जाहीर पाठिंबा असणार आहे तसेच सक्रिय सहभाग सुद्धा असणार आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणी करिता जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथे मनोज जरांगे पाटील यांचे शांततेच्या मार्गाने आंदोलन सुरू असताना आंदोलन करत्या महिलांना पुरुष लहान मुले यांच्यावर लाठी चार्ज करण्यात आला त्या हल्ल्याच्या निषेधार्थ दिनांक 8 सप्टेंबर 2023 रोजी तेल्हारा बंदचे आयोजन करण्यात आले आहे



