महाराष्ट्रविदर्भशैक्षणिक

श्री संत गजानन महाराज विद्या मंदिरात दहीहंडीश्रीकृष्ण जन्माष्टमी निमित्त आयोजन

वाशिम जिल्हा प्रतिनिधी
अजय गायकवाड

मालेगाव : – मालेगाव शहरातील श्री संत गजानन महाराज विद्या मंदिरात दहीहंडीचे आयोजन दि.७ रोजी श्रीकृष्ण जन्माष्टमी निमित्त करण्यात आले होते कार्यक्रमाच्या सुरुवातीला भगवान श्रीकृष्ण श्री तुळजाभवानी,श्री जगदंबा देवी,सरस्वती देवी,श्री संत गजानन महाराज,महात्मा फुले,सावित्रीबाई फुले,स्व तुळजाराम गाभणे यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले विद्यालयाचे विद्यार्थी भगवान श्रीकृष्ण व श्री राधेच्या वेशभूषेत आले होते यावेळी गोविंदा रे गोपाळा,मैय्या यशोदा या गीतांवर विद्यार्थ्यांनी बहारदार नृत्य सादर केली शाळेच्या प्रांगणात दहीहंडी बांधण्यात आली ती बालगोपाल गोविंदा नी फोडली कार्यक्रमासाठी विद्यामंदिराचे व्यवस्थापक कपिल भालेराव,
मुख्याध्यापिका रंजना कांबळे,शिक्षिका स्मिता गवई,स्वाती सुरडकर,माधुरी डहाळे,लक्ष्मी बोरकर,सुजित अवचार,दिनेश ठाकरे,पायल कान्हेड,ज्ञानेश्वर रावणचवरे सेविका राधाताई काळे आदींनी परिश्रम घेतले कार्यक्रमाचे संचालन स्मिता वानखडे व पायल कान्हेड यांनी प्रास्ताविक दिनेश ठाकरे यांनी तर आभार प्रदर्शन ज्ञानेश्वर रावणचवरे यांनी केले.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button